CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल
CID fame Dinesh Phadnis Heart Attack : CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस यांनी हृदयविकाराचा झटका आला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल CID's Fredericks Aka Dinesh Phadnis Suffers Heart Attack Actor Hospitalised On Ventilator Support know bollywood Entertainment Television Latest Update CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/03/688fc2c3f2290c853808568d970b62771701578462074254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
CID fame Dinesh Phadnis Heart Attack : सीआयडी (CID) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व पात्र घराघरांत पोहोचले आहेत. या मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस (Dinesh Phadnis) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश यांना हृदयविकाराचा झटका
दिनेश फडनिस यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दयानंद शेट्टी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दयानंद शेट्टी यांनी सीआयडी या मालिकेत दयाची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
दयानंद शेट्टी म्हणाले की,"दिनेश यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत. ते लवकरच घरी यावे अशी प्रार्थना करत आहे". दुसरीकडे दिनेश यांना हृदयविकाराचा झटका आल्याने चाहतेही हैरान झाले आहेत. चाहतेही दिनेश यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत".
दिनेशच्या करिअरबद्दल जाणून घ्या... (Dinesh Phandis Details)
'सीआयडी' (CID) हा नव्वदच्या दशकातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आजही या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमातील सर्वच पात्र सुपरहिट ठरले आहेत. या कार्यक्रमात दिनेश फडनीस यांनी इंस्फेक्टरची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली. या कार्यक्रमासह त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय कार्यक्रमातही काम केलं आहे. पण गेल्या एका वर्षापासून ते अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत. सध्या ते मराठी सिनेमांची संहिता लिहित होते. आमिर खानच्या 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या सिनेमांतही ते झळकले आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला यावे अशी चाहत्यांची इच्छा आहे.
संबंधित बातम्या
CID मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन; शिवाजी साटम यांच्याकडून शोक व्यक्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)