CID Latest Promo: तोच जोश, तोच उत्साह, ACP प्रद्युमन म्हणाले, "कुछ तो गड़बड है"; गुन्हेगारांचा फडशा पाडण्यासाठी CID सज्ज
CID Latest Promo: सीआयडी निर्मात्यांनी टीव्ही शोचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये तुम्हाला शोचा तोच जुना रंग आणि नवीन स्टाइल पाहायला मिळणार आहे.

CID Latest Promo: वर्षानुवर्ष गुन्हेगारांचा छडा लावत मनोरंजनाचा छोटा पडदा गाजवणारी सीआयडी मालका आता पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. 1998 ते 2018 अशी 20 वर्षे छोट्या पडद्यावर गाजलेला लोकप्रिय शो सीआयडी (CID) पाच वर्षांच्या ब्रेकनंतर भारतीय टेलिव्हिजनवर (Indian Television) पुनरागमन करणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये, शो परत येईल अशी घोषणा करण्यात आली आणि नव्या सीझनचा टीझर रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांचे लाडके दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युमन हे त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवताना पाहायला मिळेल यात काही शंका नाहीच. अशातच या मालिकेचा टीझर लॉन्च करण्यात आला. यामध्ये अभिजीत दयाला गोळी मारतो, टीझर पाहून चाहते पुरते हादरुन गेले आहेत. टीझरमध्ये दाखवण्यात आलेलं दृश्य, सीआयडीच्या त्रिकुटातील एखाद्या गाजलेल्या, मोठ्या लोकप्रिय पात्राच्या समाप्तीचे संकेत तर नाहीत, अशी शंका चाहत्यांना येत आहे.
CID च्या ताज्या प्रोमोमध्ये, शिवाजी साटम त्यांचा आयकॉनिक डायलॉग 'कुछ तो गड़बड है...' म्हणतात. यामुळे अनेक लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. ताज्या प्रोमोचे शीर्षक होतं, "उनकी कहानी बाकी है जिनका नाम ही काफी है!" याआधीच्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना दार उघडताना दया लाथ मारण्याचे लोकप्रिय दृश्य पाहायला मिळालेलं. आता नव्या प्रोमोमध्ये गुन्ह्यांची उकल करण्यासाठी जुनी टीम परत आल्याचं पाहायला मिळालं. सीआयडीच्या पुनरागमनासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
View this post on Instagram
नवीनतम प्रोमोच्या कमेंट सेक्शनमध्ये एका फॅननं लिहिलंय की, "माझा आवडता शो, मी खूप उत्साहित आहे." आणखी एकानं लिहिलंय की, "ऑल टाईम फेव्हरेट शो." तर दुसऱ्यानं, "धन्यवाद सोनी टीव्ही. आमचा आवडता कार्यक्रम पुन्हा टीव्हीवर पाहण्याचा हा एक चांगला क्षण आहे."
एका युजरनं अशीही कमेंट केली आहे की, "सीआयडी परत येत आहे. उफ्फ प्रत्येकजण परत येत आहे आणि प्रतीक्षा करू शकत नाही." दुसरी कमेंट अशीही आहे की, "ओह डॅम सीआयडी पूर्णपणे धमाकेदार फिल्मसची व्हाईब्स देत आहे." सीआयडी 21 डिसेंबरपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री 10 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
