CID in Marathi : 'दया दरवाजा तोडून टाक...', सीआयडीची टीम आता 'मराठी'त गुन्ह्यांचा शोध लावणार
CID in Marathi : सीआयडी मालिका आता मराठीत सुरु होणार आहे. त्यामुळे सत्याचा शोध घेण्यासाठी एसीपी प्रद्युम्न यांची टीम पुन्हा येणार आहे.
CID in Marathi : छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी (CID) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. या मालिकेने तब्बल 20 वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत ही टीम प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा ही टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकच नव्हे तर मराठीत ही टीम सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवर सीआयडी ही मालिका पुन्हा एकदा सुरु होणार आहे. अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युम्न हे पुन्हा एकदा सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहेत. 90 व्या दशकातील ही गाजलेली मालिका आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्जा झालीये. नुकतच सोनी मराठी वाहिनीवर प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
वाहिनीकडून प्रोमो शेअर
इंस्पेक्टर दया, इंस्पेक्टर अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न येत आहे गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी येत आहेत. सीआयडी आता मराठीत... असा प्रोमो वाहिनीकडून शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. तसेच सीआयडीच्या या टीमला प्रेक्षक आता मराठीत भेटण्यासाठीही सज्ज असल्याचं पाहायला मिळणार आहे.
कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा असे अनेक डॉयलॉग आता प्रेक्षकांना मराठी ऐकायला मिळणार आहेत. सीआयडी या क्राईम मालिकेचा पहिला भाग 21 जानेवारी 1998 रोजी प्रसारित झाला होता. जवळपास सलग 20 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर 2018 मध्ये 1 हजार 547 भाग प्रसारित झाल्यानंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
View this post on Instagram