एक्स्प्लोर

Chala Hawa Yeu Dya Exclusive : 'चला हवा येऊ द्या'च्या टीमला धक्का, फक्त चौघांनाच शेवटच्या दिवसाच्या शूटची कल्पना, आज थुकरटवाडीत शेवटचं शूटिंग!

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या'च्या टीमला मोठा धक्का बसला आहे. अचानक हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय झी मराठीने घेतला आहे.

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या फक्त चर्चा सुरू असताना झी मराठी (Zee Marathi) वाहिनीने अचानक हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'हवा येऊ द्या'च्या टीमला मोठा धक्का बसला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या शूटिंगचा आज (12 मार्च 2024) शेवटचा दिवस आहे. पण झी मराठीच्या टीमने 'चला हवा येऊ द्या'मधील भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugde) या चौघांनाच शेवटच्या दिवसाच्या शूटची कल्पना दिली आहे. इतर विनोदवीर आणि क्रू मेंबर यांना मात्र काहीही कल्पना दिलेली नाही. 

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे हे महत्त्वाचा भाग आहेत. पण त्यांच्याव्यतिरिक्त काहीशे मंडळी या कार्यक्रमात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. 'चला हवा येऊ द्या' अचानक बंद होणार असल्याने या सर्व कलाकारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज थूकरटवाडीत शेवटच्या दिवसाचं शूटिंग पार पडणार आहे. 

200 पेक्षा अधिक मंडळी होते 'चला हवा येऊ द्या'चा भाग 

गेल्या 10 वर्षांपासून आपण ज्या कार्यक्रमाचा भाग आहोत तो कार्यक्रम अचानक काही कारणाने बंद होत असल्याने 'हवा येऊ द्या'च्या संपूर्ण टीमलाच मोठा धक्का बसला आहे. 200 पेक्षा अधिक मंडळी या कार्यक्रमाचा भाग होते. आता कार्यक्रम बंद होत असल्याने एकीकडे प्रेक्षक नाराज झाले असताना दुसरीकडे 'हवा येऊ द्या'च्या टीमकडूनदेखील चॅनलवर नाराजी व्यक्त केली जात आहे. सागर कारंडेने सर्वात आधी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून निरोप घेतला होता. त्यानंतर या कार्यक्रमाचा सूत्रधार डॉ. निलेश साबळेने सोडला. त्यानंतर लगेचच कुशल बद्रिकेने सोडला. पण चॅनलसोबत बोलणं झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा कार्यक्रम करण्यास होणार दिला होता. 

'चला हवा येऊ द्या'चा शेवटचा एपिसोड असणार खास

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड खूपच खास असणार आहे. अत्यंत दिमाखात या कार्यक्रमाचं शूटिंग पार पडणार असून विनोदविरांसाठी खास निरोपसमारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच 'शिवा', 'पारू', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'नवरी मिळे हिटलरला' या कार्यक्रमांचं प्रमोशन होणार आहे. 'चला हवा येऊ द्या'चा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' तब्बल 10 वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप; आज शूटिंगचा शेवटचा दिवस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget