एक्स्प्लोर

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sushil Kumar Modi Passes Away: बिहारमधील भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेय. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Sushil Kumar Modi Passes Away: बिहारमधील भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेय. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील सात महिन्यापासून कॅन्सरसोबत त्यांचा लढा सुरु होता. सुशीलकुमार मोदी आजारपणामुळे लोकसभा प्रचारावेळी उपस्थित नव्हते. त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. 

बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ट्विट करुन सुशील कुमार मोदी यांच्या निधनाबाबत माहिती दिली. सुशील कुमार यांच्या निधनामुळं बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते विजयकुमार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "भाजपचे वरिष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आपल्यात राहिले नाहीत. संपूर्ण भाजप परिवारासह माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी ही मोठी हानी आहे. आपल्या संघटन कौशल्यासह प्रशासकीय समज आणि सामाजिक राजकीय विषयांवर आपल्या सखोल माहितीसाठी ते कायम लक्षात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देओ तसेच या शोकप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो"

 
सुशील मोदी, नीतीश कुमार आणि लालू प्रसाद  यादव यांचा जेपी आंदोलन महत्वाचा सहभाग होता. सुशीलकुमार मोदी पहिल्यापासूनच आरएसएससोबत जोडले गेले होते. 1971 मध्ये सुशीलकुमार मोदी यांनी  विद्यार्थी राजकारणातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर युवा नेते म्हणून त्यांची ओळख झाली. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले. 1990 मध्ये सुशील यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी होऊन ते आमदार झाले. त्यानंतर बिहारच्या राजकारणात त्यांचं वजन वाढत गेले.  

2004 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार मोदी भाजपच्या तिकिटावर भागलपूरमधून खासदार झाले. 2005 मध्ये त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. तेव्हापासून ते विधान परिषदेचे सदस्य होते. सुशीलकुमार मोदी 2005 ते 2013 आणि 2017 ते 2020 पर्यंत बिहारचे अर्थमंत्री होते.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court :इंटरनेट पूर्ववत करा,मेट्रो- रेल्वे संदर्भात 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
इंटरनेट पूर्ववत करा, 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, यूट्यूबर ध्रुव राठीचं काय झालं?
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, ध्रुव राठीचं काय झालं?
Abhijeet Dipke : दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget