Sagar Karande, Bharat Ganeshpure : भारत गणेशपुरे आणि सागर कारंडेची 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट? हिंदी शोमध्ये करणार काम
Sagar Karande,Bharat Ganeshpure : भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.
Sagar Karande, Bharat Ganeshpure : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. निलेश साबळे (Nilesh Sable) हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugade),भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि सागर कारंडे ( Sagar Karande) हे या कलाकार 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधील त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण दोन कलाकार लवकरच या शोमधून एक्झिट घेणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे दोघे लवकरच 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा निरोप घेणार आहे, असं म्हटलं जात आहे. सध्या सोनी टिव्हीवरील 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारत आणि सागर हे दोघे प्रेक्षकांना हसवताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचे परीक्षण अर्चना पुरण सिंह आणि शेखर सुमान हे करणार आहेत. त्यामुळे आता भारत आणि सागर हे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामधून एक्झिट घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
सोनी टिव्हीवरील नवा शो
सोनी टिव्हीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सागर आणि भारत हे प्रेक्षकांना जोक सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भेटा भारत आणि सागर यांना, ते तुमचा स्ट्रेस दूर करणार आहेत. पाहा 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' शनिवारी आणि रविवारी रात्री 9.30 वाजता. फक्त सोनी टिव्हीवर' 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' या शोमध्ये सागर आणि भारत यांचा विनोदी अंदाज बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सागर आणि भारत हे सोशल मीडियावर त्यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची माहिती प्रेक्षकांना देत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची तसेच कार्यक्रमांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
हेही वाचा :