Suchitra Krishnamoorthi : 'लेकीनं डेटिंग साईटवर टाकली प्रोफाईल अन्...'; सुचित्रा कृष्णमूर्तीने केला गौप्यस्फोट
Actress Suchitra Krishnamoorthi : सुचित्रा कृष्णमूर्तीचे प्रोफाईल तिच्या मुलीने म्हणजेच कावेरी कपूरने एका डेटिंग साईटवर टाकले होते.
Suchitra Krishnamoorthi Dating Site : अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi) आणि शेखर कपूर (Shekhar Kapur) 1997 साली लग्नबंधनात अडकले होते. तर 2006 साली त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सुचित्रा कृष्णमूर्तीच्या मुलीचे नाव कावेरी कपूर (Kaveri Kapur) असे आहे. कावेरी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कावेरी सध्या तिच्या आईसोबत म्हणजेच सुचित्रा कृष्णमूर्तीसोबत राहते. नुकत्याच एका मुलाखतीत सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाली, माझ्या लेकीने डेटिंग साईटवर माझी प्रोफाईल टाकली होती".
मुलीच्या आग्रहाखातर डेटिंग साइटवर टाकली प्रोफाइल
सुचित्राची मुलगी कावेरी लवकरच दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्या नातवासोबत वर्धन पुरीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशातच कावेरीने एका डेटिंग साईटवर सुचित्राची प्रोफाईल टाकली होती. सुचित्राने डेटिंग साईटवर प्रोफाईल टाकावी असा कावेरीचा आग्रह होता. पण सुचित्राला मात्र हे मान्य नव्हते. लवकरच सुचित्रा तिचा हा अनुभव एका कादंबरीच्या माध्यमातून चाहत्यांना सांगणार आहे.
कावेरीने काही दिवसांपूर्वी एका डेटिंग साईटवर सुचित्राची प्रोफाईल टाकली होती. सुचित्राला हे मान्य नव्हते. पण मुलीच्या आग्रहामुळे तिने डेटिंग साईटवर प्रोफाईल टाकायला पसंती दर्शवली. त्यानंतर मुलीनेच सुचित्राचे नाव नोंदवत प्रोफाईलदेखील बनवले.
सुचित्रा कृष्णमूर्ती कोण आहे?
सुचित्रा कृष्णमूर्तीने छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'कभी हां कभी ना' या सिनेमात सुचित्रा शाहरुख खानसोबत दिसून आली होती. शाहरुख-आणि सुचित्राची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. सध्या सुचित्रा सिनेसृष्टीपासून दूर असून मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे.
संबंधित बातम्या