Saurav Gurjar: द कपिल शर्मा शोवर भडकला 'ब्रह्मास्त्र' मधील अभिनेता; म्हणाला, 'कपिल तू प्रेक्षकांना हसवतो पण तुझी टीम...'
'ब्रह्मास्त्र' चित्रपटामधील अभिनेत्यानं कपिल शर्माच्या (Kapil Sharma) टीमवर आरोप केले आहेत. एक ट्वीट शेअर करुन या अभिनेत्यानं ‘द कपिल शर्मा शो’ च्या टीमवर काही आरोप केले आहेत.
Saurav Gurjar Bashes Out On Kapil Sharma: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. कपिल हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कपिल हा अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता नुकतेच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामधील अभिनेत्यानं कपिल शर्माच्या टीमवर आरोप केले आहेत. एक ट्वीट शेअर करुन या अभिनेत्यानं ‘द कपिल शर्मा शो’ च्या टीमवर काही आरोप केले आहेत.
द कपिल शर्मा शोमध्ये ‘पोस्ट का पोस्टमार्टम’ नावाचं एक सेगमेंट असते. यामध्ये सेलिब्रिटींच्या पोस्टला नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स वाचून दाखवल्या जातात. नुकतीच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. रणबीर हा ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये गेला होता. यावेळी शोमधील ‘पोस्ट का पोस्टमार्टम’ या सेगमेंट दरम्यान रणबीर आणि अभिनेता सौरव गुर्जर (Saurav Gurjar) यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स वाचण्यात आल्या. या कमेंट्स खोट्या आहेत, असा आरोप सौरवनं 'द कपिल शर्मा शो' च्या टीमवर केला.
आप अच्छे इंसान है @KapilSharmaK9 लोगो को हॅसाते हैं लेकिन आप और आपकी टीम यें झूठें कमेंट कैसे दिखा सकते हैं किसी की सोशल मीडिया पर।
— Saurav Gurjar (@Sanga_WWE) March 5, 2023
This is not acceptable😡
जय हिंद🇮🇳 #TheKapilSharmaShow pic.twitter.com/W8iKOfOTXY
सौरवनं शेअर केलं ट्वीट
ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये सौरव आणि रणबीरनं काम केलं. त्या दोघांचा फोटो द कपिल शर्मा शोमधील ‘पोस्ट का पोस्टमार्टम’या सेगमेंटमध्ये दाखवण्यात आला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सौरवनं ट्विटरवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कपिल शर्मा तू चांगला माणूस आहेस. तू लोकांना हसवतोस, पण तू आणि तुझी टीम कुणाच्या तरी सोशल मीडिया अकाऊंटवरील खोट्या कमेंट्स कशा दाखवता? हे मान्य न करण्यासारखं आहे.' सौरवनं शेअर केलेल्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. विविध सेलिब्रिटी या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: