Bigg Boss Season 4 Marathi 2023 live updates : 'बिग बॉस मराठी 4'च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात; जाणून घ्या बिग बॉस संबंधित सर्व अपडेट्स एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Bigg Boss Season 4 Marathi 2023 live updates : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) म्हटलं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचते. मग पर्व कधी सुरु होणार? सदस्य कोण असणार? सिझनच घर कसं असेल? आणि बरंच काही... आता संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे ते म्हणजे या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार याची. अखेर तो क्षण आला आहे. 100 दिवसांपूर्वी 16 सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहेत टॉप पाच (Top 5) सदस्य. यात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या (Bigg Boss Marathi Season 4 Finalists) स्पर्धकांचा समावेश आहे.
बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील सदस्य अगणिक टास्क आणि अडचणींना सामोरे गेले. कधी कधी घरच्यांच्या आठवणीने डोळे पाणावले तर कधी सदस्य घराबाहेर गेला ही गोष्ट मनाला चटका लावून गेली. हे घर अशा अनेक क्षणांचे साक्षिदार राहिले आहे. आता हेच घर निरोप घेण्याच्या वाटेवर आहे. कारण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही.
महाअंतिम सोहळा कधी रंगणार? (Bigg Boss Marathi 4 Grand Finale)
'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्वदेखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं आणि कानाकोपर्यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या टॉप पाच स्पर्धकांमधून कोणता सदस्य ठरणार 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. येत्या रविवारी 'बिग बॉस मराठी'च्या चौथाचा पर्वाचा महाअंतिम सोहळा 8 जानेवारी रोजी संध्या 7.00 वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घराला यावर्षी कधी अपूर्वाच्या आवाजाने तर कधी अमृताच्या रडण्याने हलवून सोडलं. कधी अक्षयची स्ट्रॅटेजी तर कधी राखीचे राडे आणि फुल ऑन एंटरटेनमेंट ने हे घर सतत चर्चेत राहिले. कधी हे घर विकास आणि अपूर्वाच्या लुटुपुटुच्या भांडणांचे साक्षिदार राहिले तर कधी घरात घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचे. कधी सदस्यांसोबत हे घर खूप हसलं तर कधी त्याला देखील अश्रू अनावर झाले. या घराने सदस्याचे प्रत्येक रूप पहिले. मायाळू, खोडकर, भांडखोर, संवदेनशील, कारस्थानी... या भिंती आणि या घरातील प्रत्येक वस्तू याचे साक्षिदार असतील.
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4'च्या घरातून मास्टर माइंड किरण माने बाहेर; 'या' 'Top 2' स्पर्धकांत आता अटीतटीची लढत
Bigg Boss Marathi 4 : Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4'च्या घरातून मास्टर माइंड किरण माने बाहेर पडला आहे. आता अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या दोन स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4'च्या घरातून मास्टर माइंड अक्षय केळकर बाहेर; 'या' 'Top 2' स्पर्धकांत आता अटीतटीची लढत
Bigg Boss Marathi 4 : Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4'च्या घरातून मास्टर माइंड किरण माने बाहेर पडला आहे. आता अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या दोन स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4'च्या 'Top 4' स्पर्धकांमधून कोल्हापूरची तिखट मिरची Amruta Dhongade बाद
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातील 'Top 4' स्पर्धकांमधून कोल्हापूरची तिखट मिरची अमृता धोंगडे (Amruta Dhongade) बाद झाली आहे.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi 4 : Grand Finale मध्ये मेघा घाडगेचा "काटा किर्रर्र" गाण्यावरचा थरारक डान्स
Bigg Boss Marathi 4 : Grand Finale मध्ये मेघा घाडगेचा "काटा किर्रर्र" गाण्यावरचा थरारक डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi 4 : Entertainment Queen राखी सावंतने 9 लाखांची रक्कम स्वीकारून ट्रॉफीच्या रेसमधून पडली बाहेर!
Bigg Boss Marathi 4 : Entertainment Queen राखी सावंतने 9 लाखांची रक्कम स्वीकारून ट्रॉफीच्या रेसमधून पडली बाहेर!
View this post on Instagram