Bigg Boss Marathi : छोटा पुढारीचा मोठा गेम, बिग बॉसच्या घरात कॅप्टनचाच आदेश धुडकावला; आता पुढे काय होणार?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आता कॅप्टनचाच निर्णय घरातल्यांना मान्य होत नसल्याचं पाहायला मिळतंय.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घराला अखेर पहिला कॅप्टन मिळाला आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकरला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरात निक्कीचीच चर्चा आणि हवा होती. पण आता अंकिता कॅप्टन झाल्याने यापुढे गेम चेंज झालेला पाहायला मिळेल.
भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता प्रभू-वालावलकरला पहिल्या आठवड्यात प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. पण आता दुसऱ्या आठवड्यात हीच कोकणची चेडवा कॅप्टन झाल्याने तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या भागात अंकिता घरातील सदस्यांना कामे वाटताना दिसून येणार आहे. अंकिताने दिलेलं काम करण्यास घन:श्याम नकार देताना दिसून येईल.
घन:श्यामने धुडकावला कॅप्टनचा आदेश
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घन:श्याम अंकिताला म्हणतोय,"मला एकच कोणतं तरी काम दे". त्यावर अंकिता म्हणतेय,"दोन कामे असतील तरी एकावेळी तुला एकच करायचं आहे". त्यावर घन:श्याम वाद घालत म्हणतोय,"मला एकच काम दे". अंकिता म्हणते,"एकावरच अन्याय नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मला घरात कमी भांडणे हवी आहेत." आता घन:श्याम नक्की काय काम करणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा.
डीपीजवळ घन:श्याम ढसाढसा रडला
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो आउट झाला आहे. या प्रोमोमध्ये 'छोटा पुढारी' घन:श्याम दरोडे धनंजय पोवारकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटत आहे. धनंजयकडे येऊन घन:श्याम म्हणतो की,"माझ्या घरच्यांना म्हणायचंय तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही त्यामुळे लोकंही म्हणतात यांचा मुलगा 'बिग बॉस'मध्ये गेलाय कसा?''. यावर घन:श्यामला समजावत धनंजय म्हणतो,"शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय मापता येणार?" असे म्हणत डीपी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो.
View this post on Instagram