एक्स्प्लोर

Bigg boss marathi season 3 winner : विशाल निकम 'बिग बॉस मराठी सिझन 3' चा महाविजेता, दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा

Bigg Boss Marathi 3 : विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये रंगली चुरशीची स्पर्धा.

bigg boss marathi season 3 winner : विशाल निकम 'बिग बॉस मराठी सिझन 3'चा (Bigg Boss Marathi 3) महाविजेता ठरला आहे. विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती. 100 दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्यांची एन्ट्री झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झाले. या प्रवासाची सुरुवात झाली 15 सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि आता बघता बघता 'बिग बॉस मराठी सिझन 3'ने निरोप घेतला आहे. 

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडणाने तर कधी रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आले. पण आता हा प्रवास संपला आहे. घराघरांत 'बिग बॉस मराठी 3' कार्यक्रमाची चर्चा सुरू होती.  टॉप 5 मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती.  17 सदस्यांसोबत सुरू झालेला 100 दिवसांचा प्रवास आता संपला आहे. विशाल निकमला 20 लाख धनराशी आणि ट्रॉफी मिळाली आहे. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रविवारी बिग बॉसच्या घराचा दरवाजा शेवटचा उघडला गेला. जय दुधाने आणि विशाल निकम हे 'बिग बॉस मराठी सिझन 3' चे टॉप 2 सदस्य होते. त्यातून विशाल निकम या पर्वाचा महाविजेता झाला आहे. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम काही सदस्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात जय दुधाने मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचे नाव शनिवार वाडा असे आहे.

कोण आहे विशाल निकम?
विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली जिल्ह्यातील देविखिंडी येथे झाला. विशालला अभिनयासोबतच फिटनेसचीदेखील आवड आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAjit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणीABP Majha Headlines : 12 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal on Sharad Pawar :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Embed widget