Bigg Boss Marathi 5 : "मार अरबाज ह्याला, मार..." तेवढ्यात अभिजीत कळवळला; बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क, फुल ऑन राडा
Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. यावेळी घरात चांगलाच राडा पाहायला मिळणार असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

Bigg Boss Marathi Day 18 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) घरातील राडा आणि फुल ऑन कल्ला पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात टीम A आणि टीम B ने बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं होतं. नॉमिनेशन टाक्स पार पडल्यानंतर आता बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीसाठी टाक्स बाहेर पडणार आहे. टास्क म्हटलं की कल्ला आणि राडा होणारचं. बिग बॉसच्या घरात आज कॅप्टनसी टाक्समध्ये फुल ऑन राडा दिसणार आहे. कलर्स मराठीने आजच्या एपिसोडचा नवा प्रोमो शेअर केल आहे. यामध्ये निक्की अरबाजला म्हणते, "मार याला मार" आणि दुसरीकडे अभिजीत सावंत वेदनेनं कळवळताना दिसत आहे.
निक्की म्हणाली, "मारा, मारा" अन् अभिजीत वेदनेने कळवळला
बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात बिग बॉसच्या घरात नवीन कॅप्टन होण्यासाठी नवं कार्य पार पडणार आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहेत की, नवीन टास्कमध्ये घरातील सदस्यांना बोटीतून बसून मोती शोधायचे आहेत आणि कॅप्टनपदाचे उमेदवार बाजूला करायचे आहेत. दरम्यान, प्रोमोमध्ये सदस्य निक्कीला अडवताना दिसत आहे, तर ती बोलते "मला पकडायचं नाही". अभिजीत बोलतो, "अरबाज तूला आतमध्ये जाण्यास परवानगी नाही". त्यानंतर निक्की बोलते, "अरबाज घे, मार.. अरबाज मार याला मार". यानंतर अभिजीत वेदनेनं कळवळताना दिसत आहे.
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये फुल ऑन राडा
View this post on Instagram
कोण होणार नवा कॅप्टन?
घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान अंकिता वालावलकरला मिळाला पण, त्यानंतर आता तिच्या कॅप्टनसीचा कार्यकाळ संपला आहे. यानंतर आता घरातील नवीन कॅप्टन होण्यासाठी सदस्यांची रस्सीखेंच सुरु असल्याचं दिसत आहे. कॅप्टनसी कार्यात नेमकं काय घडणार आणि टास्क जिंकून बिग बॉस मराठीच्या घराती नवीन कॅप्टन कोण होणार याची उत्सुकता बिग बॉस प्रेमींना लागली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi 5 : "त्याला गेम खेळता येत नाही", वैभवच्या निर्णयामुळे टीम A नाखुष; गुलीगत सूरजसह चार सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

