(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : सगळ्यात कमजोर दोन खेळाडू म्हणजे घनश्या:म आणि वैभव; भाऊच्या धक्क्यावर सदस्यांसमोर येणार महाराष्ट्राचं मत
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात सदस्यांना महाराष्ट्राला त्यांच्याविषयी वाटत असलेलं महाराष्ट्राचं मत कळणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरु झाल्यापासून वाद आणि राडा पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य काहीही झालं की, 'महाराष्ट्र बघतोय' हा डायलॉग हमखास मारत असतात. खरं तर सदस्य कशाप्रकारे खेळत आहेत हे महाराष्ट्र खरंच बघतोय.'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्यांसमोर येणार महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया समोर येणार आहेत. रितेश भाऊ 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांना पहिल्यांदाच महाराष्ट्र काय बघतोय, महाराष्ट्राचा मूड काय आहे, हे दाखवणार आहे.
सगळ्यात कमजोर दोन खेळाडू म्हणजे घनश्या:म आणि वैभव
कलर्स मराठीने शेअर केलेल्या बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नवीन प्रोमोमध्ये रितेश भाऊ (Riteish Deshmukh) म्हणतोय, "मी तुम्हाला दाखवणारे तुमच्याबद्दल महाराष्ट्र काय बोलतोय ते". त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या कमेंट्स वाचताना सदस्य दिसून येतात. वैभव कमेंट वाचतो की,"सगळ्यात कमजोर दोन खेळाडू म्हणूजे घन:श्याम आणि वैभव". पुढे अभिजीत सावंत कमेंट वाचतो, "तुझ्यासारख्या पावडरवाल्याला लोळवला", डीपी वाचतो की "निक्की गँगसोबत भिड". त्यावर स्पष्टीकरण देत डीपी म्हणतो, "खरं तर अजून मी कोणासोबत भिडलेलोच नाही". एकंदरीतच आजच्या भागात सदस्यांना महाराष्ट्राला त्यांच्याविषयी वाटत असलेलं महाराष्ट्राचं मत कळणार आहे.
भाऊच्या धक्क्यावर सदस्यांसमोर येणार महाराष्ट्राचं मत
View this post on Instagram
'अबीर गुलाल' मालिकेची टीम 'बिग बॉस मराठी'च्या घरात
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अक्षय केळकर, गायत्री दातार आणि पायल जाधव हे 'अबीर गुलाल' मालिकेतील कलाकार जाणार आहेत. त्यावेळी ते सदस्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीतील ट्रॉफी द्यायला लावतील. दरम्यान निक्की वर्षा उसगांवकरांना 'खाष्ट सासू'ची ट्रॉफी देताना दिसून येईल.
गुलिगत सूरज चव्हाणने गाजवलाय आठवडा
'बिग बॉस मराठी'चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. याबद्दल भाऊच्या धक्क्यावर रितेश सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहे. सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याची खेळी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :