एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर; महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख करणार होस्टिंग

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) नव्हे तर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.

Bigg Boss Marathi 5 Latest Update : 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5)  हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. चौथा सीझन संपल्यापासून चाहते पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता 'बिग बॉस मराठी 5' संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी' सुरू झाल्यापासून महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहेत. पण आता पाचव्या पर्वाचा मात्र ते भाग नसतील. बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. 

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेअर केला आला असून त्यामध्ये 'बिग बॉस'चा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये  एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज 

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.  

'बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi season 5 update : मोठी बातमी : आता अवघ्या काही तासांची प्रतीक्षा, 'येतोय सर्व रिऍलिटी शोचा बाप'; आपला 'मराठी बिग बॉस' लवकरच सुरु होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivani Vijay Wadettiwar  : वीज गेल्यामुळे काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवारांची भर सभेत शिवीगाळSudhakar Kohale Nagpur :  काँग्रेसच्या आरोपाला भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचं प्रत्युत्तरTuljapur Rana Jagjit Singh :'ठाकरेंनी तुळजाभवानी मंदिर विकासासाठी एक रुपयाही दिला नाही'TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
Embed widget