Bigg Boss Marathi 3: कोण घेणार आज बिग बॉसच्या घरातून निरोप
Bigg Boss Marathi 3: आज बिग बॉस मराठीच्या घरातील एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. तर घरात एका नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे.
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात कालपासून विकेण्डचा डाव रंगला आहे. या विकेण्डच्या डावात महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेताना दिसून येत आहेत. कालच्या भागात मांजरेकरांनी घरातील सर्व सदस्यांना सुनावले. आज घरातील सदस्यांना त्यांचे चाहते सदस्यांबद्दल कोण कोणाकडे चुगली करत होतं ते सांगणार आहेत. आज एक सदस्य बिग बॉसच्याच्या घराचा निरोप घेणार आहे. तर प्रोमेमध्ये एका सदस्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री होत असल्याचे दिसून येत आहे.
अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, आदिश वैद्य या तिघांना आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते. तर कीर्तनकार शिवलीला पाटीलने तब्येतीच्या कारणामुळे घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवलीला, अक्षय, सुरेखा, आदिश नंतर कोण घराबाहेर जाणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जय, विकास, मीनल, विशाल हे सदस्य कालच्या भागात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून सेफ झाले होते.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील सदस्यांना घरात राहून आता सहा आठवडे झाले आहेत. त्यामुळे सातव्या आठवड्यात कोण टिकणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गेल्या आठवड्याभरात बिग बॉस मराठीच्या घरात अनेक रंगतदार टास्क रंगले. यात अद्भुत नगरावर ताबा मिळविण्यासाठी राक्षस आणि देवदूतांमध्ये युद्ध झालेलं दिसून आलं, यात बिग बॉसने स्पर्धकांना 'स्वर्ग की नरक' हे नॉमिनेशन कार्य दिले होते. या नॉमिनेशन कार्यामुळे घरातील सदस्यांना भांडणांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर घरातील स्पर्धकांना बिग बॉसने 'संयमाची ऐशीतेशी' हे साप्ताहिक कार्य दिले होते. या टास्कमध्ये स्पर्धक राक्षस आणि देवदुताच्या भूमिकेत होते. त्यानंतर घरात रंगले ते म्हणजे 'आयना का बायना घेतल्या शिवाय जायना' हा कॅप्टनसी टास्क.
Bigg Boss Marathi 3 : आज मांजरेकर चावडीवर घेणार स्पर्धकांची शाळा, घरात होणार दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री
बिग बॉस मराठीच्या घरात होणार 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
प्रोमोमध्ये एक अभिनेत्री बिग बॉसच्या मंचावर नृत्य करताना दिसत आहे. तसेच मी बिग बॉसच्या घरात धुमाकुळ घालायला येत आहे, असंदेखील ती म्हणत आहे. मात्र ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसून येत नाही. त्यामुळेच ही अभिनेत्री नक्की कोण, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. परंतु ही अभिनेत्री नीता शेट्टी असल्याचा दावा काही युझर्सने केला आहे.