एक्स्प्लोर

Vishal Nikam : "हे सातही दिवस कायम लक्षात राहतील"; Bigg Boss च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमची एबीपी माझाला Exclusive प्रतिक्रिया

Vishal Nikam On Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरातील सातही दिवस कायम लक्षात राहतील, असं विशाल निकम म्हणाला.

Vishal Nikam On Bigg Boss : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम (Vishal Nikam) या पर्वात वाईल्ड कार्ड (Wild Card) सदस्य म्हणून सहभागी झाला होता. 'बिग बॉस'च्या घरातील (Vishal Nikam On Bigg Boss) प्रवासाविषयी एबीपी माझाला (Abp Majha) दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला,"बिग बॉस'चं घर मला माझ्या घरासारखचं आहे. 100 दिवस या घरात राहिल्यानंतर पुन्हा जायला मिळालं ही आनंदाची बाब आहे".

विशाल म्हणाला,"बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरात जाताना आनंद होताच पण एक जबाबदारी होती. या घरातील माझा प्रवास सात दिवसांचा होता. या सात दिवसात घरातील प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन देण्याचा मी प्रयत्न केला. घरात सकारात्मक वातावरण निर्माण केलं. सात दिवस नवीन मंडळींसोबत खूप मजा केली. हे सातही दिवस कायम लक्षात राहतील". 

विशाल पुढे म्हणाला,'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करताना माझा प्रवास सात दिवसांचा असणार याची मला कल्पना होती. पण इतर वाइल्ड कार्ड सदस्यांचा प्रवास किती दिवसांचा असेल हे मला माहीत नव्हतं. पण या सात दिवसात प्रत्येक स्पर्धकाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. 

कोण होणार 'या' पर्वाचा विजेता/विजेती? 

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता किंवा विजेती कोण होणार यासंदर्भात बोलताना विशाला म्हणाला,"तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) एक चांगली स्पर्धक होती. ती जिंकेल असा माझा अंदाज होता. पण काही कारणाने तिला घराबाहेर पडावं लागलं. तिच्या जाण्याने घरातील वातावरण खूपच नकारात्मक झालं. आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. घरातील सर्वच स्पर्धक खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे नक्की कोण जिंकेल हे सांगता येत नाही. 

विशालच्या मते, अमृता धोंगडे (Amruta Dhongade), अमृता देशमुख (Amruta Deshmukh), राखी सावंत (Rakhi Sawant), आरोह वेलणकर (Aroh Welankar) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) हे 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचे टॉप पाच (Top 5) स्पर्धक आहेत. 

विशाल निकमच्या आपल्या माणसाला खास शुभेच्छा!

शिव ठाकरेला (Shiv Thakare) शुभेच्छा देत विशाल म्हणाला,"शिव ठाकरेचा मला खूप अभिमान वाटतो. आपल्या माणसाचा माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. जिंकण्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. त्याने गेम चेंजर होण्यापेक्षा प्रामाणिकतेकडे लक्ष दिलं आहे. आपला शिव जिंकलाच पाहिजे. तोच जिंकावा अशी माझी मनापासून इच्छा आहे". 

'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना सल्ला देत विशाल म्हणाला,"सध्या प्रत्येक सेकंद खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. खेळ शेवटच्या टप्प्यात आल्याने शांतपणे खेळणं गरजेचं आहे. या पर्वात मला काही फेक स्पर्धक जाणवले आहेत. या स्पर्धकांना मला सांगावसं वाटतंय, मायबाप प्रेक्षकांना तुम्ही फसवू शकत नाही". 

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात असलेल्या फरकाविषयी विशाल म्हणाला,"बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सदस्यांमध्ये एक चांगला बॉन्ड होता आणि ते प्रेक्षकांनादेखील दिसत होतं. पण या पर्वातील सदस्यांमध्ये हा बॉन्ड कमी पडत असल्याचं मला जाणवलं. दुसऱ्या पर्वातील सदस्य नाती जपणारे होते. पण या पर्वातील सदस्यांमध्ये ते दिसत नाही. आमच्या पर्वातील स्पर्धक टीमसाठी खेळणारे होते. पण आता हा खेळ अंतिम टप्प्यात आल्याने हे स्पर्धक एकत्र येऊ शकतात". 

संबंधित बातम्या

Vishal Nikam : "पुन्हा इथे येण्यास..."; 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमची खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget