Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी बस, धन:श्याम-पॅडीमध्ये चुरस
Bigg Boss Marathi New Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्याच्या कॅप्टन्सीकडे घरातील सदस्यांचं लक्ष लागलं आहे
![Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी बस, धन:श्याम-पॅडीमध्ये चुरस Bigg Boss Marathi 2 Week 6 BBM House Captaincy Task who will become new captain marathi news Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी बस, धन:श्याम-पॅडीमध्ये चुरस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/733d7177a14fb0b7b9e0573cd1194d451725511570767322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi New Season Day 40 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांचा कल्ला वाढलेला पाहायला मिळत आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात नवीन टास्क आणि नवीन राडा पाहायला मिळणार आहे. आज बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. यामध्ये घरातील सर्व सदस्यांचा कल्ला, राडा, गोंधळ आणि धिंगाणा पाहायला मिळेल. प्रत्येक सदस्याचा नवा गेम मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी बस (Bigg Boss Marathi Captaincy Task)
आज 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात वर्षाताई कॅप्टन आहेत. पुढील आठवड्याच्या कॅप्टन्सीकडे घरातील सदस्यांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आज बिग बॉस मराठीच्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटलेली दिसून येत आहे.
कोण होणार नवा कॅप्टन? ( Who Will Become New Captain in BBM House)
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य बसमध्ये बसण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अंकिता पॅडी दादाला विचारतेय, "गणपतीत कोकणात जाण्यासाठी तिकीट कनफॉर्म करू का?". यावर उत्तर देत पॅडी दादा त्यांचं बुकिंग झाल्याचं सांगतात. दुसरीकडे अरबाज म्हणतोय, "घन:श्यामपेक्षा मी कॅप्टनसी चांगली करू शकतो". त्यावर अभिजीत म्हणतो, "घन:श्याम कॅप्टन का होऊ शकत नाही?".
पाहा बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो
View this post on Instagram
धन:श्याम-पॅडीमध्ये चुरस
प्रोमोमध्ये कॅप्टन्सीसाठी पॅडी दादा आणि घन:श्याम यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नवीन कॅप्टन होण्यासाठी सर्वच सदस्य धडपड करताना दिसत आहेत. कॅप्टनसी कंटेन्डरची बस कधी सुटणार? या बसमध्ये प्रवासी काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार हे देखील पाहावे लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Salman Khan : मोठी बातमी! सलमान खान यंदा BIGG BOSS शो होस्ट करणार नाही? 'या' कारणामुळे शोपासून दूर राहण्याची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)