Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री, कोण कोण होणार सहभागी? 'बिग बॉस 18' चा ग्रँड प्रिमिअर
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates :बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनला सुरुवात झाली असून घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
LIVE
Background
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री, गाजवणार भाईजानचा शो
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या 18 व्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता त्यांच्या येण्याने काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : चाहत पांडेनंतर दोन स्पर्धकांची घरात एंट्री
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : चाहत पांडेनंतर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पर्धकांनीही घरात प्रवेश केला आहे. घरात शहजादा धामी आणि अविनाश मिश्रा गेले आहेत. दोघेही टीव्ही कलाकार आहेत. शहजादा धामी 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये दिसला आहे, तर अविनाश मिश्राने तितलीसारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे.
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : चाहत पांडेची ठरली बिग बॉसच्या घरात जाणारी पहिली स्पर्धक
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : सलमान खानच्या बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार ऋतिक रोशनच्या जवळची व्यक्ती, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : बिग बॉस 18चा नवा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. यामध्ये ऋतिक रोशनही दिसत आहे आणि तो म्हणतोय माझा एक जवळचा मित्र या शो मध्ये एन्ट्री घेणार आहे. त्यामुळे ऋतिकचा हा मित्र नेमका कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : बिग बॉसमध्ये नाही करणार एन्ट्री, निया शर्माचा मोठा खुलासा
Bigg Boss Season 18 Grand Premiere Live Updates : निया शर्मा बिग बॉसच्या 18 व्या सीझनमध्ये एन्ट्री करणारी पहिली स्पर्धक असल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता निया शर्मा बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार नसल्याची बातमी समोर येत आहे. नियाने स्वत:च पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे.