Bigg Boss 18 : सौंदर्यवान माजी खासदार ते कथित आरोपीसह डॉली चायवाला; बिग बॉस 18 मध्ये या सदस्यांची घरात होण्याची शक्यता
Bigg Boss 18 Contestants List : बिग बॉस ओटीटी 3 संपल्यानंतर आता प्रेक्षकांना बिग बॉस 18 सीझनची आतुरता लागली आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT 3) तिसरा सीझन नुकताच संपला असून आता बिग बॉस (Bigg Boss New Season) प्रेमींना बिग बॉसच्या आगामी सीझनची आतुरता लागली आहे. बिग बॉसचा नवीन सीझन लवकरच सुरु होणार आहे. बिग बॉस सीझन 18 मध्ये कोणकोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यंदाच्या सीझनसाठी अनेक सेलिब्रिटींची नावं चर्चेत आहेत. बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या बिग बॉग 18 मध्ये सहभागी होणाऱ्या काही स्पर्धकांची नावं समोर आली आहे.
बिग बॉसच्या 18 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार?
बिग बॉसच्या सीझन 18 ची चर्चा जोरात सुरू आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 3 संपल्यापासून, बिग बॉसचे चाहते आता सीझन 18 ची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रिॲलिटी शो सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरू होऊ शकतो. मात्र, याच्या भव्य प्रीमियरची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, शोच्या स्पर्धकांची चर्चाही जोरात सुरू आहे. काही सेलिब्रिटींची नावेही समोर आली आहेत. अशा परिस्थितीत या शोची ऑफर कोण नाकारते आणि कोण बिग बॉसच्या घरामध्ये येतं, हे पाहावं लागणार आहे.
सौंदर्यवान माजी खासदाराच्या नावाची चर्चा
तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदारापासून तुनिषा शर्मा प्रकरणातील कथित आरोपीपर्यंत अनेक जणांची नावे चर्चेत आहेत. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या यंदाच्या 18 व्या सीझनमध्ये समीर रेड्डी, शीझान खान, कशिश कपूर, दिग्विजय सिंह राठी, डॉली चायवाला, झैन सैफी, नुसरत जहाँ, दलजीत कौर, एलिस कौशिक, सुरभी ज्योती, करण पटेल, दीपिका आर्या, पूजा शर्मा, फैसल शेख, हर्ष बेनिवाल आणि सोमी अली यांसारख्या सेलिब्रिटींना संपर्क साधण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
शीझान खानच्या नावाची चर्चा
छोट्या पडद्यावरील अभिनेता शीझान खान त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाईफसाठीही खूप चर्चेत आहे. अभिनेता असण्यासोबतच तो 'बिग बॉस 17' मध्ये दिसलेला फलक नाजचा भाऊ देखील आहे. शीझान खान 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसला आहे. अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणीही तो कथित आरोपी आहे. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :