Bigg Boss 18 : कमबॅक करताच बिग बॉसच्या घरात अविनाशचं तांडव, राशनच्या मुद्द्यावरुन शिल्पासोबत कडाक्याचं भांडण
Bigg Boss Season 18 : बिग बॉसने अविनाशला शोमध्ये एक संधी देत परत घेतलं आहे, यासोबतच त्याला घरातील सदस्यांना राशन देण्याची पॉवर देण्यात आली आहे.
Bigg Boss Season 18 Latest Update : बिग बॉस 18 सीझन सध्या खूप चर्चेत आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून तीन सदस्य घराबाहेर गेले. मात्र, आता त्यातील एका सदस्याची घरवापसी झाल्याचं पाहायला मिळणार आहे. सदस्यांनी व्होट करुन घराबाहेर केलेला सदस्य अविनाश मिश्रा पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात परतला आहे. यानंतर आता त्याचं घरात तांडव पाहायला मिळणार आहे. बिग बॉसने अविनाशला शोमध्ये एक संधी देत परत घेतलं आहे, यासोबतच त्याला घरातील सदस्यांना राशन देण्याची पॉवर देण्यात आली आहे.
कमबॅक करताच बिग बॉसच्या घरात अविनाशचं तांडव
बिग बॉसच्या घरात परतल्यावर अविनाश मिश्रा घरातील इतर सदस्यांच्या नाकी नऊ आणताना दिसणार आहे. आज अविनाश घरातील सदस्यांना राशन देण्यावरुन वाद घालताना दिसणार आहे. बिग बॉसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये राशन देण्यावरुन शिल्पा शिरोडकर आणि अविनाश मिश्रा यांच्या जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळणार आहे. यानंतर शिल्पा शिरोडकर अविनाशने दिलेल्या राशनमध्ये बनलेलं जेवण खाण्यास नकार देताना दिसत आहे.
राशनच्या मुद्द्यावरुन शिल्पासोबत कडाक्याचं भांडण
प्रोमोमध्ये शिल्पा अविनाशला म्हणते की, नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी नॉन-व्हेज बनवायचं आहे. यावर अविनाश म्हणतो, नाही, ते बनणार नाही. मी बेसिक राशन जे काल रात्र दिलं होतं, तेच देणार आहे. तुम्ही व्हेज पण खाता ना?" यावर शिल्पा म्हणजे की, "मी काय खाते आणि काय नाही, हा तुझा प्रॉब्लेम नाहीय. अविनाश पुढे म्हणतो की, तुम्ही दुसऱ्यांच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी हे करताय, पण माझ्या गुड बुक्समध्ये तुम्ही कधीही येऊ शकत नाही, ही गोष्ट तुमच्या डोक्यात बसवून घ्या". यावर शिल्पा म्हणते की, "मला तुझ्या गुड बुक्समध्ये यायचंही नाहीय, मी तुझ्यासाठी इथे आली नाहीय". पुढे प्रोमोच्या शेवटी शिल्पा म्हणते की, "मी आता त्याच्याकडून आलेलं काहीही खाणार नाही".
बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो आऊट
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :