Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? अर्चना गौतमने केला 'TOP 5' फायनलिस्टचा खुलासा
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम आहे.
![Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? अर्चना गौतमने केला 'TOP 5' फायनलिस्टचा खुलासा Bigg Boss 17 Winner Top Five Finalist Archana Gautam Reveals Vicky Jain Winner Of Salman Khan Show Munawar Faruqui Aishwarya Sharma Top 5 Finalists Ankita Lokhande Entertainment Television Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? अर्चना गौतमने केला 'TOP 5' फायनलिस्टचा खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/17/edd1aa684872d52620aa34f11c278b021700187787080254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 17 Top 5 Finalist : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा यासाठी स्पर्धकदेखील प्रयत्न करत आहेत. 'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अर्चना गौतमने आता या पर्वातील 'टॉप 5' फायनलिस्टचा खुलासा केला आहे.
'बिग बॉस 17'चे टॉप 5 फायनलिस्ट कोण असणार?
'बिग बॉस 17' हा नाट्यमय कार्यक्रम आहे. आता अर्चना गौतमने 'बिग बॉस 17'च्या टॉप 5 फायनलिस्टबद्दल खुलासा केला आहे. अर्चना म्हणाली,"मी सुरुवातीपासूनच 'बिग बॉस 17' फॉलो करत आहे. 'बिग बॉस 17'च्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये ऐश्वर्या शर्मा, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, विकी जैन, अंकिता लोखंडे आणि खानजादीचा समावेश होऊ शकतो.
'बिग बॉस 17'चा विजेता कोण असणार? (Bigg Boss 17 Winner)
अर्चना म्हणाली,"विकी या पर्वाचा विजेता होईल असं मला वाटतं. तर मुनव्वरला प्रेक्षक विजेता ठरवतील. विकी हा एक उत्तम खिलाडी असून त्याची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ऐश्वर्या शर्माने 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण नील भट्ट या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचा खरा खेळ सुरू होईल".
अर्चना गौतम पुढे म्हणाली,"ऐश्वर्या शर्मा चांगली खेत आहे. त्यामुळे ती जिंकावी अशी माझी इच्छा आहे. पण तिचा पती नील बाहेर पडल्यानंतरच तिच्या खऱ्या खेळाला सुरुवात होईल. ऐश्वर्याला मी ओळखते त्यामुळे ती आणखी चांगली खेळू शकते असं मला वाटतं".
अंकिता लोखंडे 'बिग बॉस'च्या घरात प्रेग्नंट?
अंकिता लोखंडे 'बिग बॉस'च्या घरात प्रेग्नंट झाल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस'च्या घरात विकीसोबत बोलतानाचा अंकिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये अभिनेत्री म्हणत आहे,"आता मला मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत आहे. तसेच आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे. मला पाळीही आली नाही. माझी प्रेग्नंसी टेस्ट झाली आहे. आता मला घरी जायचं आहे".
#AnkitaLokhande is expecting pregnancy👶 😳😳 in the Bigg Boss 17 house, she said mere periods nhi aye hai , aaj/kal me mera urine test hua hai reports ani baki hai, mai bhut preshan huu muje kuch samjh nhi arha pic.twitter.com/AgvfXMPzuP
— Bigg Boss 17 live (@Biggboss17_live) November 15, 2023
संबंधित बातम्या
Ankita Lokhande : पीरियड्स आले नाहीत, घरी जाऊ द्या.... अंकिता लोखंडेची 'Bigg Boss'च्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)