Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातील ईशा आणि समर्थचा रोमान्स पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, 'लस्ट स्टोरीज...'
सध्याचा ईशा ही एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ईशा आणि समर्थ जुरेल यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक जण सध्या ईशा आणि समर्थ यांना ट्रोल करत आहेत.
Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा शो सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सुरुवातीच्या एपिसोडपासूनच अभिनेत्री ईशा मालवीय (Isha Malviya) चर्चेत आहे. सध्याचा ईशा ही एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ईशा आणि समर्थ जुरेल (Samarth Jurel) यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकरी सध्या ईशा आणि समर्थ यांना ट्रोल करत आहेत.
ईशा आणि समर्थ यांचा बिग बॉसच्या घरात रोमान्स
ईशा आणि समर्थ यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, समर्थ हा अनेक वेळा ईशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. त्यानंतर समर्थ हा ईशाच्या गालावर किस करतो. ईशा आणि समर्थ यांचा बिग बॉसचा घरातील हा रोमान्स पाहून नेटकरी भडकले आहेत. अनेकांनी ईशा आणि समर्थ यांच्या व्हिडीओला कमेंट्स करुन त्या दोघांना ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
बिग बॉसच्या घरातील व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ईशा आणि समर्थ यांना ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवा." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "टेम्पटेशन आयलँडमध्ये यांना पाठवा"
पाहा व्हिडीओ:
Chintu galat show me aagaya hainpic.twitter.com/VXoD6MjYaB
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 17, 2023
अभिषेक आणि ईशा यांनी बिग बॉस 17 मध्ये एकत्र एन्ट्री केली होती. एकीकडे अभिषेक ईशाच्या प्रेमात होता तर दुसरीकडे ईशाला त्याच्यासोबत फक्त मैत्रीचे नाते ठेवत होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरात समर्थची एन्ट्री झाली आहे. ईशा ही सध्या समर्थला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे.
जाणून घ्या ईशाबद्दल
ईशा मालवीय ही एक अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएंसर आहे. "उडारियां" या मालिकेमुळे ईशाला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं जॅस्मिन ही भूमिका साकारली. 2020 मध्ये ती बी प्राकच्या 'जिसके लिए' या गाण्यात दिसली होती. ईशानं अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे.
विकी जैन, अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: