![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aishwarya Sharma : इंजिनिअर ते लोकप्रिय अभिनेत्री; छोट्या पडद्यावर राज्य करणारी 'गुम है किसी के प्यार में' फेम ऐश्वर्या शर्मा!
'खतरों के खिलाडी'नंतर (KKK 13) 'बिग बॉस'चं (Bigg Boss 17) घर गाजवायला ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) सज्ज आहे.
![Aishwarya Sharma : इंजिनिअर ते लोकप्रिय अभिनेत्री; छोट्या पडद्यावर राज्य करणारी 'गुम है किसी के प्यार में' फेम ऐश्वर्या शर्मा! Bigg Boss 17 Contestants Aishwarya Sharma Ghum hai Kisikey Pyaar Meiin Fame actress Career Profile Neil Bhatt KKK 13 Entertainment Television Aishwarya Sharma : इंजिनिअर ते लोकप्रिय अभिनेत्री; छोट्या पडद्यावर राज्य करणारी 'गुम है किसी के प्यार में' फेम ऐश्वर्या शर्मा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/7fd0fb5a5d9bc2a725b6b4d94e1d001e1697428969736254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aishwarya Sharma : ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार में' (Ghum hai Kisikey Pyaar Meiin) या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणाऱ्या मालिकेच्या माध्यमातून ऐश्वर्या घराघरांत पोहोचली. आजही ऐश्वर्याच छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. 'खतरों के खिलाडी'नंतर (KKK 13) 'बिग बॉस'चं (Bigg Boss 17) घर गाजवायला ऐश्वर्या शर्मा सज्ज आहे.
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत ऐश्वर्याने पत्रलेखा ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. ही मालिका तिच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्टीनेही लकी ठरली. या मालिकेच्या सेटवरच अभिनेत्री सहकलाकार नील भट्टच्या (Neil Bhatt) प्रेमात पडली. मालिकेच्या सेटवर ऐश्वर्या आणि नीलची छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
कोण आहे ऐश्वर्या शर्मा (Who Is Aishwarya Sharma)
ऐश्वर्या शर्मा ही उज्जैनची आहे. आज अभिनेत्री म्हणून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असली तरी या क्षेत्रात येण्याआधी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. ऐश्वर्याला लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याची इच्छा होती. अभ्यासात गोडी न लागल्याने तिने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 'कोड रेड' या मालिकेच्या माध्यमातून तिने अभिनयप्रवासाला सुरुवात केली.
View this post on Instagram
ऐश्वर्या शर्माच्या करिअरबद्दल जाणून घ्या... (Aishwarya Sharma Career)
ऐश्वर्याने 'गुम है किसी के प्यार में'आधी सांखला संकट मोचन महाबनी हनुमान, सूर्यपुत्र कर्ण आणि जांबाद सिंदबाद या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर 'मेरी दुर्गा' या जाहीरातीतही ती झळकली. माधुरी टॉकिज नामक वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. ऐश्वर्याची एकूण संपत्ती 16 कोटींच्या आसपास आहे, असे म्हटले जाते.
ऐश्वर्या शर्मा एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ऐश्वर्याने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला होता. 'तुम दुआ अब मेरी आखरी बन गए' हे गाणं गाताना ती दिसली होती. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ऐश्वर्या सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 17 Final Contestants List : विनोदवीर, वकील ते पत्रकार; 'बिग बॉस 17'मध्ये अतरंगी स्पर्धकांची एन्ट्री!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)