Arun Srikanth Mashetty: हैदराबादचा 'अचानक भयानक' आता खेळणार बिग बॉसमधील टास्क; जाणून घ्या गेमर अरुण महाशेट्टीचा प्रवास
Bigg Boss 17: प्रसिद्ध युट्यूबर आणि गेमर अरुण श्रीकांत महाशेट्टी (Arun Srikanth Mashetty) यानं देखील बिग बॉस 17 या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
Arun Srikanth Mashetty: बिग बॉसच्या (Bigg Boss 17) चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.बिग बॉसचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बिग बॉस 17 हा कार्यक्रम सुरु झाला आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि गेमर अरुण श्रीकांत महाशेट्टी (Arun Srikanth Mashetty) यानं देखील बिग बॉस 17 या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अरुण श्रीकांत महाशेट्टी हा एक गेमर आहे. त्याचे एक युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर तो त्याचे गेमिंग व्हिडीओ शेअर करतो. इंस्टाग्रामवर त्याचे 606K फॉलोअर्स आहेत. तो एक डिजिटल कंटेंट क्रिएटर असून तो मूळचा हैदराबादचा आहे. तो इंस्टाग्रामवरील सर्वात लोकप्रिय बिग बॉस 17 स्टार्सपैकी एक आहे.
गेमिंग व्हिडीओ व्यतिरिक्त, अरुण हा प्रँक व्हिडीओसाठी देखील ओळखला जातो. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अरुण महाशेट्टीचे टोपणनाव 'अचानक भयानक' असं आहे. बिग बॉसच्या प्रीमियरमध्ये देखील सलमाननं प्रेक्षकांना अरुण श्रीकांत महाशेट्टीची ओळख 'अचानक भयानक' अशा नावानेच करुन दिली.
बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये अरुण श्रीकांत महाशेट्टीची माहिती दिली आहे. प्रोमोमध्ये अरुण हा पर्पल कलरचा अऊटफिट आणि ब्लॅक शूज अशा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
अरुणच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या प्रीमियरमधील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अरुण हा सलमानला त्याच्या खऱ्या नवाबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच अरुण हा सलमानला बिग बॉस-17 मधील त्याच्या गेम प्लॅनबाबत देखील सांगतो. अरुणच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "तबाही मचा देंगे. फुल ऑन एंटरटेनमेंट होगा, एन्जॉय करो! हर जगह, अरुणभाई दिखना चाहिए"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: