Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मधील 'या' स्पर्धकाला थेट रितेश देशमुखचा पाठिंबा; इतर सेलिब्रिटींचाही सपोर्ट
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मधील अभिषेक कुमारला (Abhishek Kumar) थेट रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) पाठिंबा मिळत आहे.
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'बिग बॉस 17'मधील अभिषेक कुमारला (Abhishek Kumar) थेट रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) पाठिंबा मिळत आहे.
'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात अभिषेक कुमारला अश्रू अनावर झाले होते. समर्थ जुरेल आणि ईशा मालवीयने नॉमिनेशन दरम्यान अभिषेकला डिवचलं. अभिषेकच्या मानसिक आरोग्याबद्दल त्यांनी नॅशनल टेलिव्हिजनवर मजा घेतली. त्यानंतर अभिषेकला अश्रू अनावर झाले होते. अभिषेकला अश्रू अनावर झालेले पाहून बिग बॉसमधील एक्स स्पर्धकांनी ईशा आणि समर्थची शाळा घेतली. तर दुसरीकडे अभिनेता रितेश देशमुखदेखील अभिषेकला पाठिंबा देताना दिसून आला.
Heart goes out to Abhishek #BiggBoss17
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 2, 2024
'त्या' कृतीने सेलिब्रिटी भडकले
ऐश्वर्या शर्माने लिहिलं आहे,"ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल खूप वाईट खेळत आहेत. एखाद्या व्यक्तीला ते एवढा त्रास कसे देऊ शकतात. ईशा आणि समर्थला कोणीच काही बोलत नाही. बिग बॉसने काहीतरी अॅक्शन घ्यायला हवी". राजीव अदातियाने लिहिलं आहे,"अभिषेक आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. चिंता करू नका. मी तुझा मित्र तुझ्यासोबतच आहे. तू खरचं खूप स्ट्रॉन्ग आहेस". रितेश देशमुखने ट्वीट करत लिहिलं आहे,"अभिषेकसाठी खूप वाईट वाटत आहे".
'या' कारणाने अभिषेक ईशाला करतो नॉमिनेट
अभिषेकची मैत्रीण मुस्कान टेलीचक्करला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली,"ईशा आपला बॉयफ्रेंड समर्थसाठी काहीही करू शकते. स्वत:च्या फायद्यासाठी तिने अभिषेकचा वापर केला आहे. ईशा अभिषेकसोबत कशीही वागत असली तरी तो तिला नॉमिनेट करत नाही. आजही अभिषेकच्या मनात ईशाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. पण आता अभिषेकने ईशाला नॉमिनेट करण्याची वेळ आली आहे".
'बिग बॉस 17'ची नवी कॅप्टन अंकिता लोखंडे
'बिग बॉस 17'ची नवी कॅप्टन अंकिता लोखंडे बनली आहे. कॅप्टनसी कार्यात पती विकी जैनला मागे टाकत अंकिताने बाजी मारली आहे. 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या कार्यक्रमाचा कोण विजेता होणार याची चाहत्यांची उत्सुकता लागली आहे.
संबंधित बातम्या