Bigg Boss 17 : सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा फोटो पाहून अंकिता लोखंडेला बसलेला धक्का; म्हणाली,"माझे हात-पाय थंड पडलेले"
Ankita Lokhande on Sushant Singh Rajput : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अंकिता लोखंडेने पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Ankita Lokhande Remember Sushant Singh Rajput : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा तिला सुशांतची आठवण आली आहे. सुशांतचा शेवटचा फोटो पाहून अंकिता लोखंडेला मोठा धक्का बसला होता.
'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली आहे. आता हा कार्यक्रम सुरू होऊन 11 दिवस पूर्ण झाले आहेत. या कार्यक्रमात अनेकदा अंकिता लोखंडे आपल्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात खुलासा करताना दिसत आहे. तसेच एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. सुशांत सिंह राजपूतसोबतचं तिचं नातं, ब्रेकअप, पहिली भेट अशा अनेक गोष्टींवर अंकिताने भाष्य केलं आहे. आता सुशांतचा शेवटचा फोटो पाहिल्यानंतर अंकिताची अवस्था कशी झाली होती, हे तिने सांगितलं आहे.
#AnkitaLokhande shares the painful memories back of June 2020! She mentions how brilliant he was and what all he would have achieved he was still there! #BiggBoss17• #BB17
— adya (@d_addy_a) January 1, 2024
pic.twitter.com/eYox6gAOMC
अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत
'बिग बॉस 17' या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात अंकिता लोखंडे मुनव्वर फारुकीसोबत बोलताना सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत रमलेली दिसून आली. मुनव्वरसोबत बोलताना अंकिता म्हणाली,"सुशांतच्या निधनानंतर त्याचा शेवटचा फोटो पाहिला तेव्हाच सर्व संपलं होतं".
सुशांतचा शेवटचा फोटो पाहून अंकिता लोखंडेला बसला धक्का
अंकिता लोखंडे म्हणाली,"सुशांतच्या निधनानंतर त्याचा शेवटचा फोटो पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता. मी सुन्न झाले होते. माझे हात-पाय थंड पडले होते. सुशांत शांत झोपला आहे, असंच मला वाटलं होतं. त्यावेळी माझ्या डोक्यात अनेक विचार येऊन गेले. सुशांतला मी चांगलं ओळखत होते".
अंकिता पुढे म्हणाली,"सुशांतचं कुटुंबिय बिहारमध्ये होतं. त्याची एक बहिण अमेरिका, दुसरी चंदीगढमध्ये होती. तर वडिल पटना आणि दिल्लीमध्ये होते. त्याचे कुटुंबिय सुशिक्षित आहे. कुटुंबातील सर्वच व्यक्ती खूप हुशार आहेत. सुशांतदेखील खूप इंटेलिजेंट होता".
'बिग बॉस'च्या घरात अनेकदा अंकिताला सुशांतची आठवण आली आहे. अंकिता आणि सुशांत रिलेशनमध्ये होते. त्यावेळी इतर अभिनेत्रींसोबतचे त्याचे इंटीमेट सीन अंकिताला पाहावत नव्हते. त्यावेळी सुशांतने तिची माफी मागितली होती.
संबंधित बातम्या