Bigg Boss 16: शिव ठाकरे अन् एमसी स्टॅनला मागे टाकत ही अभिनेत्री ठरणार बिग बॉसची विजेती? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
आता 'द खबरी' या सोशल मीडिया पोस्टवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Bigg Boss 16: बिग बॉस 16 (Bigg Boss 16) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक वेळा या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होतात. आता बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले काही दिवसात पार पडणार आहे. बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण ठरणार आहे? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. आता 'द खबरी' या सोशल मीडिया पोस्टवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) ही बिग बॉसच्या या सिझनची विजेती ठरणार आहे,अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या होत आहे. 'द खबरी' या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये प्रियांकाचं नाव पहिल्या क्रमांकावर लिहिलं आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि एमसी स्टॅन (MC Stan) चं नाव लिहिलं आहे. या पोस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर अर्चना गौतमचं (Archana Gautam) नाव लिहिण्यात आलं आहे. आता बिग बॉस 16 ची विजेती प्रियांका ठरेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल.
View this post on Instagram
प्रियांका चहर चौधरीनं या मालिकांमध्ये केलं काम
26 वर्षाच्या प्रियांकाने ‘ये है चाहतें’, ‘परिणीती’ या शोमध्ये काम केले आहे. 'उडारिया' या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं तेजो संधू ही भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
बिग बॉस या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो. बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण ठरणार आहे? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :