Bigg Boss 16: बिग बॉस- 16 च्या ग्रँड फिनालेआधीच सुंबुल झाली आऊट; घराबाहेर गेल्यानंतर व्यक्त केल्या भावना
सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) ही बिग बॉसच्या 16 सिझनमधून आऊट झाली आहे. एका मुलाखतीमध्ये सुंबुलनं तिचा बिग बॉसमधील (Bigg Boss 16) प्रवास सांगितला.
Bigg Boss 16: बिग बॉस-16 चा (Bigg Boss 16) ग्रँड फिनालेला केवळ एक आठवडा राहिला आहे. शनिवार (4 फेब्रुवारी) सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) ही घराबाहेर पडली. एका मुलाखतीमध्ये सुंबुलनं तिचा बिग बॉसमधील प्रवास सांगितला.
काय म्हणाली सुंबुल?
मुलाखतीमध्ये सुंबुल म्हणाली, "बिग बॉस'मधील माझा प्रवास अप्रतिम होता आणि मला कधीच वाटलं नव्हतं की, मी इथपर्यंत येऊ शकेल." सुंबुल बिग बॉसच्या लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती. ती अचानक शोमधून बाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला.
सुंबुलनं पुढे मुलाखतीमध्ये सांगितलं, "मी 'बिग बॉस'मध्ये जावं, हा निर्णय माझा नसून माझ्या वडिलांचा होता. त्यांनी मला 'बिग बॉस' जिंकण्यासाठी नाही तर आयुष्यातील अनेक धडे शिकण्यासाठी पाठवलं. 'बिग बॉस'मधील माझा प्रवास खूप कठीण होता. मी अनेक चढउतार पाहिले आहेत आणि हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत.'
सुंबुलनं शेअर केली पोस्ट
सुंबुलनं बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून सुंबुलनं तिच्या कुटुंबाचे, चाहत्यांचे आणि मित्रमैत्रिणींचे आभार मानले. "हा असा प्रवास होता ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव ठरला. तुमच्या मदतीशिवाय आणि माझे मित्र आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय हे साहस शक्य झाले नसते.", असं सुंबुलनं पोस्टमध्ये लिहिलं. या पोस्टमध्ये तिनं 'हक से मंडली' असंही पोस्टमध्ये लिहिलंय. मंडली या टीममध्ये सुंबुल, शिव, एससी स्टॅन, निमरीत हे स्पर्धक होते. या टीमला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. सुंबुलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच, तिच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.
View this post on Instagram
बिग बॉस या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो. बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण ठरणार आहे? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :