Ratan Tata share Photo With Rockstar Slash : रतन टाटा यांनी शेअर केला रॉकस्टार स्लॅशसोबतचा खास फोटो; रणवीरच्या कमेंटनं वेधलं लक्ष
उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी रॉकस्टार स्लॅश (Rockstar Slash) सोबतचा फोटो शेअर केला आहे.
Ratan Tata share Photo With Rockstar Slash : भारतील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. नुकताच रतन टाटांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या फोटोवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहने (ranveer singh) केलेल्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रतन टाटा यांनी रॉकस्टार स्लॅशसोबतचा फोटो सोशल मीडियवर शेअर केला. या फोटोला रतन टाटा यांनी कॅप्शन दिले, 'मी या व्यक्तीला भेटायला खूप एक्सायटेड होतो. रॉकस्टार स्लॅश त्याच्या जॅग्वार गाडीची डिलेव्हरी घेण्यासाठी आला होता.'
View this post on Instagram
रतन टाटा आणि स्लॅश यांच्या फोटोवर रणवीर सिंहने कमेंट केली, 'वाव! हे खूप कूल आहे.' रणवीरसोबतच डिनो मोरिया आणि इतर अनेक कलाकरांनी रतन टाटा यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Exclusive : 'सलमानला चावलेल्या सापाला...'; सलीम खान यांची माहिती