Bigg Boss 15 : तेजस्वीच्या विजयावर नेटकऱ्यांची नाराजी, प्रेक्षकांसाठी Pratik Sehajpal खरा विजेता
Bigg Boss 15 : नेटकऱ्यांच्या मते प्रतीक सहजपाल 'बिग बॉस 15'चा खरा विजेता आहे.
Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) ची विजेती ठरली आहे. पण नेटकऱ्यांच्या मते प्रतीक सहजपाल 'बिग बॉस 15'चा खरा विजेता आहे. प्रतीक सेहजपाल #PratikSehajpal ट्विटरवरदेखील ट्रेंड करत आहे. त्याच्या समर्थकांनी आतापर्यंत 40,000 पेक्षा अधिक ट्वीट केले आहेत.
बिग बॉसची माजी विजेती गौहर खाननेदेखील तिचे मत ट्वीट करत मांडले आहे. तिने लिहिले आहे,"लॉल... निकालादरम्यानची शांतताच सर्वकाही सांगून गेली. प्रतीक सेहजपाल तू प्रेक्षकांची मने जिंकली आहेस. तू सगळ्यांचा लाडका होतास. प्रेक्षकांचे तुझ्यावरच प्रेम आहे".
अंतिम पाच स्पर्धकांमध्ये शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, आणि प्रतीक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले.
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडणाने, कधी रडण्याने, कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आणले होते. पण आता हा प्रवास संपला आहे.
संबंधित बातम्या
Rashmika Mandanna : रणवीर सिंगच्या ‘या’ चित्रपटाची फॅन झालीये रश्मिका, पाहा काय म्हणाली नॅशनल क्रश...
Pushpa Box Office Collection : अल्लू अर्जुनने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, मोडले प्रभासच्या 'बाहुबली'चे रेकॉर्ड
Happy Birthday Preity Zinta : दोनवेळा मृत्यूला परतवलं, त्सुनामीत गमावले जवळचे मित्र, प्रीती झिंटाच्या आयुष्यातल्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)