(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 15 : करण-तेजस्वी अडकणार लग्नबंधनात? तेजस्वीच्या भावानं तर करणच्या वडिलांनी मांडलं मत
तेजस्वीच्या भावानं करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Tejasswi Prakash And Karan Kundrra : बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) चा काल (30 जानेवारी) महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाची तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही विजेती ठरली आहे. बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल काही दिवसांपूर्वी करणच्या आई- वडिलांनी प्रतिक्रिया दिली होती. तेजस्वीच्या भावानं देखील आता प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये तेजस्वीच्या भावानं सांगितलं की, 'तेजस्वी आणि करणच्या नात्याला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.' तर तेजस्वीच्या वडिलांनी म्हणाले की, 'सर्व काही ठिक झाले तर लवकरच करण आणिल तेजस्वीचा विवाह सोहळा पार पडेल. '
View this post on Instagram
या आधी देखील एका मुलाखतीमध्ये करणच्या वडिलांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते, 'जे आम्ही शोमध्ये पाहतो आणि जे ऐकतोय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत आहे. अनेक निर्णय अजून पेंडिग आहेत. जेव्हा आम्ही करणला भेटू तेव्हा आम्ही काही गोष्टींवर चर्चा करणार आहोत. आम्ही दोघांच्या सोबत आहोत. काही गोष्टी त्या दोघांसोबत आम्ही बोलणार आहोत.'
संबंधित बातम्या
Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीनं सांगितला 'कास्टिंग काउच' चा अनुभव; म्हणाली...
Kapil Sharma : ...जेव्हा कपिलच्या बक्षिसाच्या रकमेतून कापले होते तीन लाख
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha