एक्स्प्लोर
राजकीय स्वार्थासाठी जुनं प्रकरण उकरुन काढलं, बिचुकलेची 'माझा'ला पहिली प्रतिक्रिया
अभिजीत बिचुकले हा 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे.

सातारा : 'बिग बॉस मराठी सीझन 2' मधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया 'एबीपी माझा'ला मिळाली आहे. राजकीय स्वार्थासाठी 2015 सालचं जुनं प्रकरण उकरुन काढल्याचा आरोप अभिजीत बिचुकलेने केला आहे. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात सातारा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर, बिग बॉसच्या सेटवर जाऊन अभिजीत बिचुकलेला अटक केली. दरम्यान रक्तदाब वाढल्याने बिचुकलेला सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बिचुकलेला कोर्टात हजर केलं जाणार आहे. अभिजीत बिचुकले म्हणाला की, "वकील संदीप संकपाळ यांचा मी 12 वर्षांपासून भाडेकरु आहोत. त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेतले होते. पण ही गोष्ट ते अमान्य करतात. त्यांनी 2015 सालमधील जुनी केस उकरुन काढली आहे. कोर्टाची दिशाभूल करुन त्यांनी माझ्याविरोधात अटक वॉरंट काढलं. यात नक्कीच राजकीय हस्तक्षेप आहे. राजकीय स्वार्थासाठी वकील संदीप संकपाळचा उपयोग करत आहे. त्यांना आमिष दाखवून माझ्याविरोधात भडकवलं आहे, याचा सोक्षमोक्ष लगेचच लागेल. कोर्टावर आपला विश्वास आहे." संबंधित बातम्या 'बिग बॉस'च्या शाळेत इव्हेंच्युअली बिचुकले गुरुजी देणार इंग्रजीचे धडे मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला : उदयनराजे भोसले बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला Big Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात बिचुकले का बिथरले?
आणखी वाचा























