Band Baja Varaat : सोलापूरमधील नवदाम्पत्याला 'बँड बाजा वरात'कडून लग्नात मिळाला खास आहेर
Band Baja Varaat : 'बँड बाजा वरात' या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Band Baja Varaat : 'बँड बाजा वरात' (Band Baja Varaat) या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमात भावी नववधू आणि नववर व त्यांचं कुटुंब सहभागी होत असतात.
नुकतंच एका नवं दाम्पत्याला झी मराठी वाहिनीने त्यांच्या लग्नात त्यांना आहेर भेट केला.देवमाणूस मालिकेतील डिम्पल आणि डॉ.अजितकुमार देव यांनी 'बँड बाजा वरात' या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावल्याचे प्रेक्षकांनी पाहिले, निमित्त होतं या दोघांच्या मालिकेतील लग्नाच्या विशेष भागाचं. यात या दोघांना झी मराठीचा आहेर मिळाला. हाच झी मराठीचा आहेर देवमाणूसच्या टीमने सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतील नवदांपत्य ऋतुजा आणि प्रदीप यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी आदित्यकृष्ण मंगल कार्यालय उपळाई रोड बार्शी येथे दिला.
View this post on Instagram
'बँड बाजा वरात' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नव्या वर्षात अनेक नवनवीन विषयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मालिका विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. असाच प्रयोगशील 'बँड बाजा वरात' हा प्रयोगशील कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच होणार सुरू
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' चा टायटल ट्रॅक रिलीज, लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे 200 भाग पूर्ण; प्रेक्षक भक्तिरसात तल्लीन
महत्त्वाच्या बातम्या





















