एक्स्प्लोर

Celebrity Cricket League 2023: क्रिकेटच्या मैदानावर बालिका वधु फेम अविकाचा ग्लॅमरस अंदाज; व्हिडीओनं वेधलं लक्ष

Celebrity Cricket League 2023 : सेलिब्रिटी क्रिकेट लीगला अभिनेत्री अविका गौरनं हजेरी लावली. अविकानं क्रिकेटच्या मैदानावरील एक व्हिडीओ शेअर केला. 

Celebrity Cricket League 2023 : सेलिब्रिटी क्रिकेट लीगला (Celebrity Cricket League 2023) सुरुवात झाली आहे. या क्रिकेट लीगमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये मुंबई हिरोज, कर्नाटक बुलडोझर्स, चेन्नई रायनोज, तेलगू वॉरियर्स, केरळ स्ट्रायकर्स, बंगाल टायगर्स, पंजाब दे शेर आणि भोजपुरी दबंग या टीम्समध्ये एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत, असं म्हटलं जात आहे. सुनील शेट्टी (Suniel Shetty), बॉबी देओल (Bobby Deol) यासारखे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेणार आहेत. आता या क्रिकेट लीगच्या सामन्याला अभिनेत्री अविका गौरनं (Avika Gaur) हजेरी लावली. अविकानं क्रिकेटच्या मैदानावरील एक व्हिडीओ शेअर केला. 

सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या मैदानातील व्हिडीओ अविकानं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करत आहात? #CCL2023 मध्ये करमणूक आणि खिलाडूवृत्ती हे दोन्ही बघायला मिळते. यामध्ये आपल्या देशाच्या विविधतेतील एकता देखील दिसते.' अविका या व्हिडीओमध्ये डेनिम जॅकेट, पिंक शॉर्ट ड्रेस आणि व्हाईट शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. अविकानं या व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना सांगितलं की, ती सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील तेलगू वॉरियर्स या टीमला सपोर्ट करत आहे.

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Avika Gor (@avikagor)

अविकाचे चित्रपट आणि मालिका

बालिका वधू, ससुराल सिमर का आणि लाडो वीरपुर की मर्दानी या मालिकांमध्ये अविकानं काम केलं आहे.  बालिका वधू या मालिकेमुळे अविकाला विशेष पसंती मिळाली. या मालिकेत तिनं आनंदी ही भूमिका साकारली होती. अविकानं काही हिंदी आणि तेलूगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं. 1920 हॉरर ऑफ द हार्ट या आगामी चित्रपटामधून अविका ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खतरों के खिलाडी या शोमधून देखील ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. अविका सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर  1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिचा पॉपकॉर्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

 Avika Gor : 'बालिका वधू' फेम अविका करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; विक्रम भट यांच्या चित्रपटात करणार काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget