एक्स्प्लोर

Ashok Saraf : अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, कलर्स मराठी सुरु होणार 'अशोक मा.मा'

Ashok Saraf : कलर्स मराठीवर लवकरच अशोक सराफ यांचं पुन्हा दमदार कमबॅक होणार आहे. नुकताच त्यांच्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

Ashok Saraf Comeback : हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ (Ashok Saraf) यांना ओळखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. "येतोय 'महाराष्ट्राचा महानायक' लवकरच", असं म्हणत 'कलर्स मराठी'ने मालिकेची पहिली झलक आऊट केली होती. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. आता मालिकेचा पहिला प्रोमो आऊट करत प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देण्यात आलं आहे. 'कलर्स मराठी'च्या 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून  अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येतोय. नुकताच 'अशोक मा.मा.' या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. तसेच 'शिस्त म्हणजे शिस्त' हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये 'अशोक मा.मा.' असं दिसत आहे. एकंदरीतच अशोक मामा आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे.

मालिकेचा पहिला प्रोमो

'अशोक मा.मा.' या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक मामांसह आणखी कोणते कलाकार मालिकेत झळकणार? मालिका कधीपासून सुरू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

अशोक सराफांनी काय म्हटलं?

'अशोक मा.मा.' मालिकेबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले,"मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. 'टन टना टन' या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा 'कलर्स मराठी' वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Sachin Pilgaonkar : 'मी त्याच्यासोबत कधी काम केलं नाही पण...', सचिन पिळगांवकरांनी केलं महेश कोठारेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget