
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनुजला 'या' कारणामुळे आला मायाचा राग; डिंपीदेखील अनुुपमा आणि बा यांची माफी मागणार
अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे की, अनुजला मायाचा खूप राग येतो.

Anupama: "अनुपमा' (Anupama) या छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये सध्या सासू आणि सूनेचा ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे डिंपी आणि बा यांच्यामध्ये भांडण सुरू आहे. तर दुसरीकडे, अनुजला मायाचा राग आला आहे. अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे की, अनुजला मायाचा खूप राग येतो. डिंपी ही कपाडियाच्या घरी पगफेरेसाठी येणार आहे, त्यामुळे कपाडिया कुटुंबाच्या घरात तयारी सुरू झाली आहे.
डिंपीच्या पगफेरे कार्यक्रमाच्या तयारीत माया देखील मदत करते. हे पाहून अनुजला खूप राग येतो आणि तो मायावर रागावतो. तो मायाला रूममध्ये जाऊन आराम करायला सांगतो. माया त्याचे ऐकत नाही तेव्हा अनुजला तिचा राग येतो.
जेव्हा अनुपमा डिंपी आणि समरला घर सोडायला सांगते तेव्हा डिंपी बरखाला मेसेज करते आणि बरखा तिला घराबाहेर न पडण्याचा सल्ला देते. यानंतर डिंपी अनुपमा आणि बा यांची माफी मागते. डिंपी ही ठरवते की, कपाडियाच्या घरी पगफेरेसाठी गेली की, ती तिथे अनुपमाविरुद्ध बरखासोबत प्लॅन करेल.
कपाडिया कुटुंबाच्या घरी डिंपीसोबत पाखीही जाणार आहे. तर दुसऱ्या तोशू सर्वांना सांगतो की, किंजल, 'मी आणि परी यांनी नवीन घरात शिफ्ट व्हावे असे मला वाटते.' तोशूचे हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो.
अनुपमा मालिकेची स्टार कास्ट
अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. रुपाली गांगुली यांच्या अनुपमा मालिकेमधीस अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
अनुपमा मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की, डिंपीसोबत भांडण झाल्यावर, बा या घर सोडण्याचा निर्णय घेतात. त्या घराबाहेर असणाऱ्या बागेत जाऊन बसतात. जेव्हा अनुपमा येते आणि बाला असे बाहेर बसलेलं पाहते तेव्हा तिला खूप वाईट वाटते. तेव्हा बा रडत रडत अनुपमासमोर त्यांचा मुद्दा मांडतात.
संबंधित बातम्या
Anupama: 'अनुपमा' मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; डिंपीवर भडकली अनुपमा, 'हे' आहे कारण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
