एक्स्प्लोर

Anshuman Vichare Birthday: दगडाचं कामही भीक मागून मिळवलं, 'फु बाई फू'नं दिली ओळख, अंशुमन विचारेनं विनोदी विश्वात 'असं' टाकलं पाऊल

आता वेगवेगळ्या विनोदी नाटकांमधून सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अंशुमनचं पहिलं काम दगडाचं होतं. नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पहिल्या कामाचा किस्सा त्यानं सांगितला. 

Anshuman Vichare Birthday: आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसायला भाग पाडणारा अभेनेता अंशुमन विचारे यानं अचूक पंच काढत कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा यासारख्या विनोदी कार्यक्रमांमधून चाहत्यांना रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळवून देणाऱ्या अंशुमन विचारे या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. मनोरंजन विश्वात कोणताही गॉडफादर नसलेल्या अंशुमनला त्याच्या क्षेत्रात प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. आता वेगवेगळ्या विनोदी नाटकांमधून सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अंशुमनचं पहिलं काम दगडाचं होतं. नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पहिल्या कामाचा किस्सा त्यानं सांगितला. 

अंशुमनला करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट

आपल्या प्रत्येकाला लहानपणी आपण ॲक्टर व्हावं असं वाटत असतं. चाळीत राहणाऱ्यांकडे तर दर तिसच्या घरात एक ॲक्टर असतो. मी तर कोकणस्थ आहे. त्यामुळे मी तर पहिल्यापासूनच ॲक्टर आहे. आपल्या आईवडिलांशी आपण कसं बोलतो इथपासूनच ॲक्टींग येते ना.. पण मला सुरुवातीला आपण हॉटेल मॅनेजमेंट करावं असं फार मनात होतं. असं अंशुमन म्हणाला. पण या कोर्सची फीस न परवडल्यानं ग्रॅड्यूएशनच्या दरम्यान नाटक एकांकीकांकडे वळल्याचं तो सांगतो.

पहिला चान्स कसा मिळाला?

आपण जेंव्हा क्षेत्रात नवे असतो. आपल्यामागे कोणताही गॉडफादर नसतो तेंव्हा काम कसं मिळवायचं हा मोठा स्ट्रगल असतो. मग याच्याकडे भीक माग त्याच्याकडे भीक माग हे होतं. सोबत या क्षेत्रात येऊ इच्छिणारे हा आपल्याला चान्स देईल असं म्हणले म्हणून एकाकडे गेलो.तो ही म्हणला चान्स देतो. मी सध्या शाहरुखसोबत काम करतोय वगैरे बऱ्याच थापा त्यानं मारल्या..मग म्हणाला काम मिळवायचं असेल तर पैसे भरावे लागतील.  ही सगळी गंमत सांगत नाद सोडला आणि एकांकिका स्पर्धा..याला भेट त्याला भेट असं करत करत पहिला रोल मिळाला तो एका नाटकात. तोही दगडाचा! दगडाचा रोलही भीक मागूनच मिळाला. पण कामासाठी मी चिकटा असल्याचं अंशुमन म्हणतो. मन लावून काम केलं आणि दगडाच्या रोलसाठी उत्तेजनार्थही मिळालं.

फू बाई फू या शोनं घराघरात पोहोचवलं...

एकांकिका, नाटक, सिनेमा, गाणं अशा सगळ्याच कामात कामानं स्वत:ला सिद्ध केलेल्या अंशुमनची चमक फु बाई फु या विनोदी शोनं घराघरात पोहोचवली. रात्री टीव्हीवर लागणाऱ्या या कार्यक्रमातून अंशूमन घरोघरी पोहोचला. वरात आली घरात, भरत आला परत अशा अनेक सिनेमांमधूनही अंशूमननं त्याच्या कामाची छाप सोडली. एका कामातून दुसरं काम शोधत आता विनोदी विश्वात आघाडीचा नट म्हणून तो ओळखला जातो.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget