Superstar Singer : अमितराज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग, छोट्या पडद्यावर दिसणार परिक्षकांच्या भूमिकेत
Superstar Singer : सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमितराज आता छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.
Superstar Singer : छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी चांगलीच चुरस लागली आहे. सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिकांसह, रिएल्टी शोदेखील सुरू होत आहेत. छोट्या पडद्यावर ‘सुपरस्टार सिंगर’ हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली होती. आता शोसाठी सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमितराज या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हिंदीत गाजलेल्या 'सुपरस्टार सिंगर’ या शोचा हा मराठी रिमेक असणार आहे.
याआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवगेळ्या कार्यक्रमात या दोघांच्या गीतसंगीताची मेजवानी रसिकांनी अनुभवली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत. 24 ऑगस्ट ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता ऑडिशन प्रक्रिया सुरू झालेले असून, लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. स्वरांच्या दुनियातील उद्याचा आवाज सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे. अमितराज आणि प्रियांका बर्वे आता महाराष्ट्रासाठी हा आवाज शोधणार आहेत.
View this post on Instagram
हे कॅप्टन रंगवणार सुरांची मैफल
'सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्या मराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या शोमध्ये रोहित राऊत, शाल्मली सुखटणकर, आशिष कुलकर्णी, संपदा माने-कदम हे कॅप्टन असणार आहेत.
या नव्या शो विषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान आणि होतकरू गायक व संगीतकारांसाठी ‘सुपरस्टार सिंगर’ ने एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आणि यासाठी परीक्षक म्हणून आमची झालेली निवड खूपच आनंददायी आहे. इतक्या वर्षात संगीत क्षेत्रातील आमचे अनुभव आणि आम्ही जे काही शिकलोय ते मी या नव्या स्पर्धकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही आतुर आहोत, अशी भावना प्रियंका बर्वे आणि अमितराज यांनी व्यक्त केली आहे.