KBC 15 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आवडतो 'हा' अभिनेता; 'केबीसी 15'च्या मंचावर केला खुलासा
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दिलीप कुमार यांचे मोठे चाहते आहेत.
Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम होता. गेल्या काही वर्षांपासून बिग बी हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी केबीसीच्या (KBC 15) मंचावर त्यांचा आवडता अभिनेता कोण याचा खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या मंचावर हरियाणातील पिंकीसोबत 'कौन बनेगा करोडपती'चा खेळ खेळत आहेत. 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पिंकी पोहोचते. पण पुढच्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने पिंकी खेळ सोडण्याचा निर्णय घेते. फक्त 6 लाख 40 हजार रुपये ती जिंकते. पिंकीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 'जहांगीर' असतं.
View this post on Instagram
पिंकीला प्रश्नाचं उत्तर देत अमिताभ बच्चन यांनी एक आठवण शेअर केली. दिलीप कुमार यांना एका सिनेमासाठी विचारणा केली. त्यावेळी त्यांना तीन भूमिकांसाठी विचारणा केली. यात वासुदेव, दिलीप कुमार आणि जहांगीर यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी 'जहांगीर' या नावाची निवड केली नाही. पण काही वर्षांनी 'मुगल-ए-आजम' या सिनेमात जहांगीरची भूमिका केली. मी दिलीप कुमार यांचा मोठा चाहता आहे, असं अमिताभ बच्चन म्हणाले. दिलीप कुमार यांचा मी मोठा चाहता आहे. भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास लिहिताना नक्कीच दिलीप कुमार यांच्यासारख्या अभिनेत्याचा विचार केला जाईल. ते एक चांगले व्यक्ती आणि अभिनेते आहेत.
'कौन बनेगा करोडपती' (KBC 15) हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत प्रबोधनही करतो. 'कौन बनेगा करोडपती 15'चा कार्यक्रम सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. 'कौन बनेगा करोडपती'ची यंदाची थीम 'ज्ञानदार, धनदार आणि शानदार' अशी आहे. 'केबीसी 15' हा कार्यक्रम प्रेक्षक सोनी टीव्हीवर पाहू शकतात.
'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर' या अमेरिकन खेळाचा हिंदी रिमेक 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम आहे. 2000 मध्ये या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वापासून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत आहेत. फक्त तिसरं पर्व शाहरुख खानने होस्ट केलं होतं.
संबंधित बातम्या