Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी नातीच्या समाजकार्याचं केलं कौतुक; म्हणाले,"मासिक पाळीदरम्यान गावातील महिलांची..."
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही मासिक पाळीदरम्यान गावातील महिलांची मदत करते.
Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda Works For Women During Period Days : "कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून लगेचच या कार्यक्रमाला पहिला करोडपतीदेखील मिळाला आहे. आता या कार्यक्रमाच्या मंचावर बिग बींनी त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या (Navya Naveli Nanda) समाजकार्याचं कौतुक केलं आहे.
'कौन बनेगा करोडपती 15'च्या 11 सप्टेंबरच्या भागात छवी राजावत आणि नीरू यादव हे स्पर्धक सहभागी झाले होते. अमिताभ बच्चन यांनी दोन्ही कुटुंबियांची ओळख करुन देताना सांगितलं की,"या महिला गावातील महिलांना त्यांच्या अडचणींमध्ये खूप मदत करतात". त्यांच्या या कार्याचं कौतुक करत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातीबद्दलही भाष्य केलं.
नव्या नवेली नंदाबद्दल (Navya Naveli Nanda) बोलताना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणाले,"मला माझी नात नव्या नवेली नंदाचा अभिमान वाटतो. नव्यासह गावातील महाविद्यालयात शिकणाऱ्या काही मुली या मासिक पाळीदरम्यान गावातील महिलांची मदत करतात. या महिलांची मदत करण्यासाठी या महिला एकत्र आल्या आहेत".
मला माझ्या नातीचा अभिमान : अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले,"मी असं ऐकलं आहे की, मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यांना खूप त्रास होतो. पण आता नव्या ही या महिलांची मदत करणाऱ्या मोहिमेचा भाग याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या या कृतीतून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल".
View this post on Instagram
नव्या नवेली नंदाबद्दल जाणून घ्या... (Who is Navya Naveli Nanda)
नव्या नवेदी नंदा ही लोकप्रिय स्टारकीड आहे. स्टाककीड असूनही नव्या नवेलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. नव्याचं स्वत:चं पॉडकास्ट आहे. श्वेता बच्चन यांची लेक नंदा ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नव्या एंटर्रेन्योर असून ती 'आरा हेल्थ'च्या माध्यमातून लोकांची मदत करते.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 'ऊंचाई' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्या 'कल्कि 2898' या सिनेमात अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या 'कौन होणार करोडपती 15'च्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
संबंधित बातम्या