Ajit Pawar and Suraj Chavan Meeting : आधी 2 बीएचके घराची घोषणा, आता सूरजचं करिअर सेट करण्याचा निर्धार; अजिदादा म्हणाले, मी रितेशसोबत बोलतो...
Ajit Pawar and Suraj Chavan Meeting : अजित पवार यांनी सूरजच्या करिअरसाठी रितेश देशमुखसोबत बोलणार असल्याचं म्हटलं आहे.
Ajit Pawar and Suraj Chavan Meeting : मागील अनेक दिवसांपासून ज्या भेटीची चर्चा सुरु होती, ती भेट अखेर झाली आहे. बिग बॉस विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी सूरज चव्हाणला घर बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे सूरजचं करिअर सेट करण्याचाही निर्धार अजितदादांनी केला असल्याचं पाहायला मिळतंय. सूरजसाठी मी रितेशसोबत (Ritiesh Deshmukh) बोलणार असल्याचं यावेळी अजितदादांनी म्हटलं.
बारामतीच्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यावर त्याचं सर्वच क्षेत्रातून कौतुक केलं जातंय. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित पवार सगळ्यांची सूरजचं तोंडभरुन कौतुक केलं. इतकच नव्हे तर सूरज जेव्हा ट्रॉफी घेऊन बारामतीमध्ये आला त्यावेळी अजित पवारांनी फोन करुन सूरजला भेटीसाठी विचारलं होतं. पण त्यावेळी सूरजला शक्य झालं नाही. आता पुण्यात हे दोन बारामतीकर भेटलेत.
त्याचं आयुष्य मार्गी लावू...
सूरजच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, सूरज बिंधास्त आहे. त्याच्या स्वभावामुळे तो बऱ्याच जणांना भावला. तो सगळ्यांमध्ये मिसळून राहिला. माझ्याच गावचा तो मुलगा आहे..मी त्याची पूर्ण माहितीही घेतलीये. आम्ही आता त्याला चांगलं घर बांधून देणार आहोत. तसेच त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे, त्यासाठीही त्याला मदत करु.. मी रितेशसोबतही बोलणार आहे. त्याचं आयुष्य मार्गी लावू.. त्याच्या आता योग्य लक्षही देऊ...
रिलचे पैसे मिळतात का?
सूरज हा त्याच्या रिलमुळे जास्त फेमस झाला. तसेच बिग बॉसमध्येही त्याची एन्ट्री ही रिलमुळेच झाली. त्यावर अजित पवारांनी त्याला विचारलं की, बिग बॉस मधे कसं बोलवलं? तेव्हा सूरजने सांगितलं की, रिल बघून मला बिग बॉसमध्ये बोलावलं. मला बिग बॉसचा कॉल आला तेव्हा खरं वाटत नव्हता. पण मग खरं वाटलं आणि गेलो. त्यानंतर रिलचे पैसे मिळतात का? त्यावर सूरजने म्हटलं की, नाही रिलचे पैसे मिळत नाहीत, आता पिक्चर येतोय माझा...