Ajit Pawar : अजित पवारांच्या 'बायोपिक'मध्ये मुख्य भूमिकेत कोणी झळकावं? दादांच्या उत्तराने वेधलं लक्ष
Ajit Pawar Biopic : 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024'दरम्यान अजित पवार यांनी आपल्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणी झळकावं याबद्दल खुलासा केला आहे.
Ajit Pawar : मराठी सिनेसृष्टीसाठी मानाचा असलेला 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' (Zee Chitra Gaurav Puraskar 2024) नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar). पुरस्कार सोहळ्यादरम्यान अजित पवार यांनी आपल्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणी झळकावं याबद्दल खुलासा केला आहे.
पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित दादा अवधूत गुप्तेने (Avadhoot Gupte) विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले आणि अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. या कार्यक्रमात अजित दादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी ही ताज्या केल्या. सिनेमांबाबतच्या आठवणी शेअर करत दादा म्हणाले,"मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलजच्या काळात मला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आवडायचे, नंतरच्या काळात शाहरुख खान (Shah Rukh Khan) आला, त्यामुळे वयानुसार आवड बदलत जाते".
'झी चित्र गौरव पुरस्कार 2024'च्या मंचावर अवधूत गुप्तेने अजित पवार यांना प्रश्न विचारला की,"जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा?". याचं उत्तर देत अजित पवार म्हणाले,"डॉक्टर निलेश साबळे (Chala Hawa yeu Dya Fame Nilesh Sabale)". त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्री देखील करून दाखवली. कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी 'थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल', असा सवाल विचारला तेव्हा दादांनी पार्थ पवार यांच नाव घेतलं.
यंदाचा 'झी चित्र गौरव 2024' गाजवला महिलांनी
बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले आहे. बॉक्स ऑफिससह यंदाचा 'झी चित्र गौरव 2024'देखील महिलांनी गाजवला आहे. उषाताई मंगेशकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर यावर्षीच्या 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे 'प्रिया बापट'. तसेच ह्या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्रींनी उपस्थिती लावली ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ आणि दुसरी म्हणजे ‘सारा अली खान’. साराने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं, तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.
झी चित्रगौरव पुरस्कार 2024
कुठे पाहाल? झी मराठी (Zee Marathi)
कधी? 16 मार्च
किती वाजता? संध्याकाळी 7 वाजता.
संबंधित बातम्या