एक्स्प्लोर
लग्नाच्या सात वर्षांनंतर राकेश बापट आणि रिद्धी डोगराच्या नात्यात दुरावा?
राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांची ओळख 'स्टार प्लस'वरील 'मर्यादा लेकिन कब तक' या मालिकेच्या सेटवर झाली होती. इथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं.
![लग्नाच्या सात वर्षांनंतर राकेश बापट आणि रिद्धी डोगराच्या नात्यात दुरावा? Actress Ridhi Dogra and actor Raqesh Bapat's 7 year old marriage in trouble? लग्नाच्या सात वर्षांनंतर राकेश बापट आणि रिद्धी डोगराच्या नात्यात दुरावा?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/07142953/Riddhi-Raquesh-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राकेश बापट आणि रिद्धी डोगरा ही छोट्या पडद्यावरील सुंदर जोडींपैकी एक आहे. परंतु लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांच्या नात्यात कटुता आल्याची माहिती आहे. या दोघांमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांना आता एकत्र राहायचं नाही. रिद्धीला राकेशपासून दूर राहायचं आहे. एवढंच काय तर दोघे घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचं कळतं.
राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांची ओळख 'स्टार प्लस'वरील 'मर्यादा लेकिन कब तक' या मालिकेच्या सेटवर झाली होती. इथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं.
रिद्धी डोगरा प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री असून तिने 'वो अपना सा', 'मर्यादा' आणि 'लागी तुझसे लगन' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर राकेश बापटने कुबूल है, मर्यादा आणि बहू हमारी रजनीकांत यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं असून 'तुम बिन' या चित्रपटातही तो झळकला होता. याशिवाय त्याने सविता दामोदर परांजपे, सर्व मंगल सावधान, वृंदावन या मराठी चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.
आशा नेगी ही रिद्धीची जवळची मैत्रीण आहे. रिद्धी आणि राकेश यांच्यामधील तणावावर काहीही बोलण्यास नकार दिला. "मी रिद्धीची मैत्रीण आहे. मला सगळं माहित आहे, पण मी याबाबत काहीही बोलणार नाही," असं ती म्हणाली. याशिवाय रिद्धीची आणखी एक मैत्रीण सरगुन मेहतानेने यासंदर्भात भाष्य करणं टाळलं.
दुसरीकडे रिद्धी डोगरानेही हे वृत्त फेटाळत, या सगळ्या बातम्या चुकीच्या असल्याचं तिने सांगितलं. तर राकेशने अद्याप याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)