एक्स्प्लोर

Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत होणार ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांची दिमाखदार एन्ट्री

Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांची दिमाखदार एन्ट्री होणार आहे.

Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गावात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. 

या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरले अप्पा आणि तात्या यांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार म्हणजे विद्याधर जोशी आणि अतुल काळे. यांच्यात पुन्हा एकदा चुरस रंगणार आहे. झेंडावंदन कार्यक्रमाला ध्वजारोहण करण्याचा मान कोणाला मिळणार यावरून भांडण सुरू असतं. गावासमोर सुरू असलेलं हे भांडण काही केल्या संपत नाही, त्या वेळी ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार हे गावचे पुढारी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आलेले असतात. त्यावेळी गावचे ज्येष्ठ पुढारी आणि जगविख्यात शास्त्रज्ञ भास्कर आनंद हे ध्वजारोहन कार्यक्रमासाठी आलेले असतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

मालिकेत भास्कर आनंद यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दारांची दिमाखदार एन्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता गावचे पुढारी आणि ज्येष्ठ या अधिकाराने ते हे भांडण सोडवतील का? ध्वजारोहण कोण करणार यावर तोडगा निघेल का, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे. 

विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑनस्क्रीन भांडण आणि भाषेपलीकडचं प्रेम सोनी मराठी वाहिनीवरली 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोमवार ते शनिवार संध्या. 7.30 वा. प्रेक्षक सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षक ही मालिका पाहू शकतात. 

जिवाची होतिया काहिली
कुठे पाहायला मिळेल? सोनी मराठी
किती वाजता? सोम.-शनि. संध्या. 7:30 वा. 

संबंधित बातम्या

Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत कानडी तडका; प्रेक्षकांना पाहायला मिळणार नवीकोरी प्रेमकहाणी

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहिते मोठ्या उत्साहात साजरी करणार 'मंगळागौर'; रंगणार विशेष भाग

महत्त्वाच्या बातम्या

Anupam Kher On Student Protest: राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget