एक्स्प्लोर

Anupam Kher On Student Protest: राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...

Anupam Kher On Student Protest: अनेक ठिकाणी जेन-झी जनरेशन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अनेक क्षेत्रांतील लोक एकवटले आहेत. अनेक सेलिब्रिटीही विद्यार्थ्यांसोबत मैदानात उतरलेत.

Anupam Kher On Student Protest: राजधानी दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे कथित 'नीट' (NEET Paper Leak Case) पेपरफुटीच्या प्रकरणावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. अनेक ठिकाणी जेन-झी जनरेशन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अनेक क्षेत्रांतील लोक एकवटले आहेत. अनेक सेलिब्रिटीही विद्यार्थ्यांसोबत मैदानात उतरलेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन विद्यार्थ्यांना पाठींबा जाहीर केलाय.  

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ जारी करून विद्यार्थ्यांना आपला मनापासून पाठिंबा दर्शविला आहे. या व्हिडीओमध्ये, आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या भावना आणि संघर्षाची दखल घेत, अनुपम खेर यांनी त्यांना आपल्या हक्कांबद्दल जागरूक राहण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर नेमकं काय म्हणाले? 

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर म्हणाले की, "नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, दोन दिवसांपूर्वी तुमच्या आंदोलनाचे फोटो पाहून मी अस्वस्थ आणि दुःखी झालो. आपली मतं व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला अशा परिस्थितीतून जावं लागू नये. मी सुद्धा एकेकाळी विद्यार्थी होतो, मी सुद्धा प्रश्न विचारले होते. मी व्यवस्थेशी भांडलो आहे. आजही माझ्या संस्थेत शेकडो विद्यार्थी आहेत. त्यामुळे, मी तुमची अस्वस्थता, राग आणि अपेक्षा समजू शकतो..."

"माझ्या मते, विद्यार्थी हा समाजाचा खरा आवाज आहे. त्यात कोणताही स्वार्थ नाही, त्यात केवळ भविष्याची चिंता आहे. त्यात हक्कांची मागणी आहे. देशाला अधिक चांगलं बनवण्याचं स्वप्नही आहेत. म्हणूनच मी मनापासून तुमच्यासोबत आहे..."

"पण मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा बाहेरचे लोक तुमच्या चळवळीत घुसखोरी करू लागतात. राजकीय अजेंडा घेऊन संधी साधतात, त्यांचा स्वतःचा अजेंडा असतो, त्यांच्यापासून सावध रहा. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की, जितके जास्त लोक सामील होतील, तितकी जास्त ताकद तुम्हाला मिळेल. पण नेहमीच तसं नसतं. अनेकदा, तेच लोक तुमच्या कमकुवतपणाचं कारण बनतात. ते तुमचा आवाज बनत नाहीत, उलट तुमचा फायदा उचलतात...", असं अनुपम खेर म्हणाले आहेत. 

दरम्यान, देशाला धडकी भरवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन छेडलं आहे. आता हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटी समोर आले आहेत. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत. 

अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा,  आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत. तर, रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर, सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त होत, विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
Chikeezing Movie Teaser: उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?
उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget