Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला आता एक महिना उलटून गेलाय. गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींनंतर आता या आंदोलनाची व्याप्ती केवळ दिल्लीपुरती राहिलेली नाही. आज महाराष्ट्रात मुंबईसह अनेक शहरात तरुण तरुणींनी रस्त्यावर येत दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सीजेपीच्या या आंदोलनात आता विरोधी पक्षांनी सक्रीय सहभाग घेतला असून ठाकरे बंधूंनीही एकत्र परिषद घेत रविवारच्या शक्तीप्रदर्शन मोर्चाची घोषणा केलीय. आज दिवसभरात महाराष्ट्रात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
दिल्लीत सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटायला सुरुवात झालीय.
मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली.
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी दिल्लीत तरुणांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला.
सांगलीत काँग्रेसनं केलेल्या आंदोलनात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
रत्नागिरीतही मोठ्या संख्येनं तरुण तरुणी रस्त्यावर उतरले.
All Shows
































