एक्स्प्लोर

Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...

Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यांनी वाचलेल्या एका पोस्टचं उदाहरण देऊन समीर चौघुले यांनी सध्याच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 

Sameer Choughule Angry On Student Protest: नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Paper Leak Case) 'कॉकरोच जनता पार्टी'नं (Cockroach Janta Party) देशभरात एल्गार पुकारला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतर (Jantar Mantar) देशभरातून विद्यार्थी एकवटले आहेत. तर, देशाच्या कानाकोपऱ्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. तसेच, या आंदोलनाला, विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही रस्त्यावर उतरले आहेत. तर, काहींनी सोशल मीडियावर व्यक्त होत, विद्यार्थ्यांना पाठींबा जाहीर केला आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेते समीर चौघुले (Actor Samir Choughule) यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी वाचलेल्या एका पोस्टचं उदाहरण देऊन समीर चौघुले (Samir Choughule) यांनी सध्याच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केलं आहे.  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले यांनी फेसुबकवर एक सविस्तर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी वाचलेल्या एका सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ दिला आहे. तर, तरुण कोवळ्या मुला मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असतील किंवा "असच पाहिजे या मुलांना" हा आनंद त्यांना होत असेल, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय, असं त्यांनी म्हटलंय. यासोबतच त्यांनी ट्रोलर्सनाही सुनावलं आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? (Samir Choughule On Student Protest)

मराठी अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून ते म्हणालेत की, "आता एकाची पोस्ट वाचली... "परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे... जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत, ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार"... सुन्न झालो... आपण माणसे नाही राहिलो... झोंबी झालो आहोत... हा कोणता 'उन्माद' भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात..."

पुढे बोलताना समीर चौघुले यांनी लिहिलंय की, "त्या तरुण कोवळ्या मुला मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असतील किंवा "असच पाहिजे या मुलांना" हा आनंद त्यांना होत असेल, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय... प्रत्येक गोष्ट संवादानं 100 टक्के सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती... तरुण कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेनं बरसलेल्या लाठ्या खूप व्यथित करतात... कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये...मुलांचे म्हणणं, समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे..."

समीर चौघुले यांनी याच पोस्टमध्ये ट्रोलर्सनाही सुनावलं आहे. पाच मुद्द्यांमध्ये समीर चौघुलेंचे ट्रोलर्सवर जबरदस्त टोले 

ट्रोलर्सना उद्धेशून बोलताना समीर चौघुले म्हणाले की, "काही टिप्स- 1. कलाकारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावे नको त्या भानगडीत पडू नये वगैरे सूचना द्यायला जाऊ नये... तुम्हाला सर्वांना तोच नियम लागू पडतो... मी ही तुमच्या सारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्हीही हिरिरीने मत मांडता, मी ही मांडतोय... 2. पहलगामच्या वेळी काय वाचा बसली होती का? त्याही वेळी व्यक्त झालोच होतो... त्यामुळे त्या वेळी का नाही बोललात कॅटेगरीत बोलू नये. 3. तुम्हाला आजपासून unfollow करतो - जशी आपली इच्छा... आनंदी रहा तुमच भलं होऊ दे... फक्त शांतपणे अनफॉलो करा... कमेंट करून सांगू नका...   4. मनातील द्वेषाचा निचरा मोकळा करायला वेगळी जागा शोधा... गलिच्छ शिवराळ हिणकस भाषा कृपया इथे वापरू नका... 5. किती पैसे मिळाले या पोस्टसाठी? - तुम्हाला मिळतात त्या पेक्षा थोडे जास्त..."

दरम्यान, देशाला धडकी भरवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन छेडलं आहे. आता हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटी समोर आले आहेत. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा,  आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत. तर, रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर, सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त होत, विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget