एक्स्प्लोर

Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ

Angad Mhaskar Second Marriage: लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं आपली लग्नगाठ बांधली असून त्याचं हे दुसरं लग्न आहे.

Marathi Actor Angad Mhaskar Second Marriage: सेलिब्रिटींची (Celebrity Wedding) लगीनसराई म्हणजे, चाहत्यांसाठी उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय. गेल्या काही महिन्यांत इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी आपली लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता या यादीत आणखी एका नव्या कलाकाराची भर पडली आहे. मराठी मालिकाविश्वातील (Marathi TV Serials) एक लोकप्रिय अभिनेता नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे.  स्टार प्रवाहवरच्या लोकप्रिय मालिकेतला खलनायक, अभिनेता अंगद म्हसकर (Marathi Actor Angad Mhaskar) यानं आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. अंगद म्हसकरनं नेहा फडकेसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. मराठमोळ्या अभिनेत्यानं अत्यंत साधेपणानं आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आपली लग्नगाठ बांधली.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मराठी अभिनेता अंगद म्हसकर (Angad Mhaskar) याचं हे दुसरं लग्न आहे. लग्नसोहळा अत्यंत साधेपणानं पार पडला. लग्नाला कुटुंबातील जवळचे नातेवाई आणि काही मित्रमंडळी उपस्थित होती. नेहा फडके असं अंगदच्या पत्नीचं नाव आहे. तर, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यानं तिच्यासोबत फोटो शेअर करून त्यांच्या नात्याबाबत चाहत्यांना सांगितलं होतं. या फोटोसोबत फ्रॉम हेअर टू फोरेवर असं कॅप्शनही अंगदनं दिलं होतं. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालाय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान मिळवणारा अभिनेता अंगद म्हसकर यानं त्याच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यानं दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली आहे. पहिल्या लग्नापासून अभिनेत्याला एक मुलगा आहे. अंगदच्या लग्नसोहळ्याचे खास क्षण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अंगदच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जातोय. 

अभिनेता अंगद म्हसकर यानं मराठी सिनेमा, मराठी मालिका आणि रंगभूमीवर अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. अभिनेत्यानं अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सातत्यानं काम करत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. खलनायक, ऐतिहासिक तसेच विनोदी भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले','बाजीराव मस्तानी', 'मध्यम सासू धडधड सून', 'गुंतता हृदय हे', 'तू तिथे मी', 'जयोस्तुते', 'अबोली' यांसारख्या मालिकांमध्ये त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर, त्यानं 'लोकमान्य : एक युगपुरुष', 'बालगंधर्व', 'बायोस्कोप', 'सविता दामोदर परांजपे', 'जग्गू अँड ज्युलिएट' यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्यात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याने एकच खळबळ, टायगरसह चालक सुद्धा जखमी
अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याने एकच खळबळ, टायगरसह चालक सुद्धा जखमी
Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Embed widget