एक्स्प्लोर

Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज

Bhootam Bhayam Sarojini Song: नृत्य, रंगतदार सादरीकरण आणि कॅची संगीत असलेलं हे गाणं चित्रपटाच्या मनोरंजनात आणखी भर घालणार आहे.

Bhootam Bhayam Sarojini Song: झी स्टुडिओज (Zee Studios) प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित 'भूतम भयम्' (Bhootam Bhayam) हा चित्रपट कथानक, कलाकार आणि गाण्यांमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं 'सरोजिनी' (Sarojini Song) प्रदर्शित झालं असून, त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नृत्य, रंगतदार सादरीकरण आणि कॅची संगीत असलेलं हे गाणं चित्रपटाच्या मनोरंजनात आणखी भर घालणार आहे.

हे गाणं सात बेरोजगार मित्रांच्या भन्नाट गोष्टीला रंगतदार वळण देतं. आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची स्वप्नं पाहाणाऱ्या या सात मित्रांची भेट सरोजिनीशी होते आणि तिच्या एका भेटीतच सगळे तिच्या प्रेमात पडतात. त्यानंतर सुरू होतो तिला इम्प्रेस करण्याचा प्रत्येकाचा वेगळा, मजेशीर आणि हटके प्रयत्न. जसराज जयंत जोशी यांच्या जबरदस्त आवाजतील या गाण्याला श्रीनाथ म्हात्रे यांचे धमाल संगीत लाभले आहे. तसेच प्राजक्त देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 

गायक जसराज जयंत जोशी म्हणतात, "सरोजिनी' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाच त्यातली धमाल ऊर्जा आणि खट्याळपणा मला खूप आवडला. सात मित्रांची निरागस प्रेमकहाणी आणि त्यांची मजेशीर धडपड आवाजातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला. गाण्याचा मूड, त्यातील विनोद आणि उत्साह कायम ठेवणं हे मोठं आव्हान होतं. रेकॉर्डिंगदरम्यान आम्ही खूप मजा केली आणि तीच ऊर्जा गाण्यात उतरली आहे. हे गाणं ऐकताना प्रेक्षकही नक्कीच गुणगुणतील आणि त्याचा मनमुराद आनंद घेतील, अशी मला खात्री आहे." 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित 'भूतम भयम्' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले आहे. येत्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऑरेंज ज्यूस गँग अर्थात करण सोनावणे (Karan Sonawane), नील साळेकर (Neel Salekar), सौरभ घाडगे (Saurabh Ghadge), सिद्धांत सरफरे (Sidhant Sarfare) आणि शुभम जाधव (Shubham Jadhav) यांच्यासह पुष्कराज चिरपुटकर (Pushkaraj Chirputkar) आणि मनमीत पेम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. 

Bhootam Bhayam Sarojini Song: सरोजिनी गाणं ऐकलंय?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget