Me Honar Superstar Chhote Ustaad-2: 'फादर्स-डे' निमित्त ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' च्या मंचावर अभिजीत खांडकेकरनं सादर केली खास कविता; पाहा व्हिडीओ
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमात फादर्स-डे च्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरनं एक खास कविता सादर केली.
Father's Day 2023 : आज अनेक लोक खास पद्धतीनं 'फादर्स डे' (Father's Day) साजरा करत आहेत. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वडिलांना फादर्स-डेच्या शुभेच्छा देतात तर काही लोक त्यांच्या वडिलांना एक खास ग्रिटींग कार्ड देऊन शुभेच्छा देतात. अशातच फादर्स-डेनिमित्त अभिनेता अभिजीत खांडकेकरनं (Abhijeet Khandkekar) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एक खास कविता सादर करताना दिसत आहे.
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमात फादर्स-डे च्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरनं एक खास कविता सादर केली. ‘मागे वळून पाहिलं तर तुम्ही दिसलाच पाहिजेत, मी धडपडण्याआधी सावरायला हात तुमचाच असला पाहिजे’ अशा या कवितेच्या ओळी आहेत. भिजीतची ही कविता ऐकल्यानंतर ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमाची सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री वैदेही परशुरामीचे देखील डोळे पाणावले. तसेच कार्यक्रमाचे परीक्षक देखील भावूक झाले.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) हा कार्यक्रम 10 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार करत आहे. 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमाचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करतात. हा कार्यक्रम शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत.
‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2’ या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये सचिन पिळगावकर हे खास परफॉर्मन्स करणार आहेत.
View this post on Instagram
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. शुद्धी कदम (Shuddhi Kadam) ही या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनली विजेती ही ठरली होती. आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: